पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ आणि हिंदुस्थानांतल्या लोकांचे डोळे उघडण्यास ह्या वि- पयाचा अभ्यास उत्तम साधनभूत होईल, अशी माझी खातरी आहे,” असें लार्ड मेकाले ह्या नामांकित ग्रंथका- रानें एके ठिकाणी ह्मटलें आहे. तें खरें आहे. आणि पर्वतांची रचना हा त्या शास्त्रांतला एक मोठा भाग आहे. ह्मणून त्याविषयीं थोडा विचार करावा, हें बरें दिसतें. ह्या आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा चतुर्थांश उघडी ज मीन आहे, व बाकीच्या पृष्ठभागावर समुद्र पसरलेला आहे. आणखी, पूर्व गोलार्धीत जितकी जमीन आहे, तिच्या- पेक्षां पुष्कळच कमी जमीन पश्चिम गोलार्धीत आहे. आ शिया, युरोप व आफ्रिका ह्या तिन्ही खंडांचें मिळून एकं- दर क्षेत्रफळ सुमारें तीन कोटि वीस लक्ष चौरस मैल आहे; उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका मिळून दीड कोटि चौ- रस मैल आहे; आणि आस्ट्रेलिया वगैरे बेटांचें क्षेत्रफळ सु- मारें तीस लक्ष चौरस मैल आहे. आशियाखंड युरोपखंडाच्या चौपट आहे, आणि आफ्रिकाखंड युरोपखंडाच्या तिप्पट आहे. एकंदर सर्व खंडांचें क्षेत्रफळ, एकंदर सर्व ल हानमोठ्या बेटांच्या क्षेत्रफळाच्या तेवीसपट आहे. भूस्तरशास्त्रावरून असे दिसतें कीं, अगदी आरंभी सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर सारखें पाणी पसरलेलें असावें, आणि नंतर, पृथ्वीच्या पोटांतल्या उष्णतेच्या योगानें व इतर कारणांनीं त्या पृष्ठभागाचा कांहीं भाग वर उचलून त्याचीं खंडें आणि बेटें बनलेली असावीं. ह्मणजे; समुद्र नाहीं असे समजून पृथ्वीच्या आकृतीचा जर विचार केला, तर मोठालीं खंडें व बेटें हीं, केवळ मोठाल्या पर्वतांवरच्या स पाट जागा होत, व त्या खंडांवरचे व बेटांवरचे डोंगर हे