पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०३ लोकांस जें स्वातंत्र्य आहे की, आपल्या पैशाबद्दल आ पणांस माल चोख आणि बराबर मिळाला पाहिजे, त्यांत तमाखोरी होऊं नये, त्या स्वातंत्र्याचें रक्षण ह्या काय- द्यानें चांगलें होतें. ह्मणून, त्या व्यापाऱ्यांचें जें स्वा- तंत्र्य गेलेंस दिसतें, तें सामाजिक स्थितीचा विचार केला ह्मणजे, गेलेंसें दिसत नाहीं, तर त्या कायद्यानें सामा- जिक स्वातंत्र्याची वृद्धि झाली आहे, किंवा निदान त्याचें रक्षण झालें आहे, असें अनुभवास येतें. ह्मणजे, एकंदरीत सांगावयाचें मिळून एवढेंच कीं, कांहीं कायद्यांच्या योगानें आपलें स्वातंत्र्य गेल्यासारखें मनु- प्यांस भासून जें वाईट वाटतें, तें उगाच भ्रांतिमूलक असतें. ह्मणून त्याचा त्यांनी चांगला विचार करावा. त्यांत एवढे मात्र पाहिले पाहिजे की, त्यापासून जी हानि झाली आहे, तिच्या मानानें हित पुष्कळ झालें आहे कीं. नाहीं ? हित अधिक झाले असले, तर तो कायदा चां- गला, आणि हानि अधिक झाली असली, तर तो कायदा वाईट; असा समज असावा. ह्मणून, कोणत्याही प्रकरणी – मग तें धर्मसंबंधी असो, सामाजिक असो, व्यावहारिक असो, किंवा राजकीय असो-आपलें थोडेंसें स्वातंत्र्य जाऊन जर बाकीच्या स्वातंत्र्याचा उपभोग उत्तम प्रकारें आपणांस घ्यावयास मिळत असेल, तर तेवढे थोडेंसें स्वातंत्र्य सोडण्यास आपण तयार असावें, हेंच विचारप्रशस्त आहे. पर्वत. भूगोलविद्या हा विषय अत्यंत महत्वाचा आहे;