पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ त्पन्न होते, ती तृप्त करण्याचें स्वातंत्र्य स्वसंतोषानें सोडून देऊन, त्याच्या मोबदला आपणास कोणीं इजा देऊं नये, अशी अवस्था संपादणें हें आहे. जो कोणी दुसऱ्या माणसाचा प्राण घेईल, त्यास देहान्त शिक्षा असावी, हैं आवश्यक आहे, असें कबूल करून, दुसऱ्याचा जीव घे- ण्याच्या क्रियेपुरतें आपलें स्वातंत्र्य सोडून देणें हें, आ- पला जीव कोणीं घेऊं नये, असा बंदोबस्त करणें आहे. , सरकारच्या परवानगीवांचून कोणत्याही माणसानें बा राची दारू तयार करितां कामास नये, आणि विकतां का- मास नये, असा कायदा आहे. ह्याच्या योगानें पुष्कळ लोकांचें एक प्रकारचें स्वातंत्र्य गेलें आहे, असे प्रथम मनांत येतें. पण, तें खरें नाहीं. तर, एके प्रकारें त्यांचें स्वातंत्र्य वाढलें आहे. तें असें. बाराची दारू हा प- दार्थ भयंकर आहे. तो भलत्याच्याच हातांत असल्यानें अनर्थ होण्याचा संभव फार आहे. त्या अनर्थापासून पुष्कळ लोकांच्या घरादारांची आणि वस्तूंची हानि व्हा- वयाची; आणि त्या घरादारांचा आणि वस्तूंचा उपभोग घेण्याचें त्यांचें जें स्वातंत्र्य आहे, तें नाहींसें व्हावयाचें; त्याचें संरक्षण व्हावें- ह्मणजे पर्यायेंकरून तें स्वातंत्र्य वा- ढवावें - ह्मणून हा कायदा केला आहे. त्यास आपण मान्य व्हावें, आणि त्याविषयीं आपणांस वाईट वाटू देऊं नये, हें योग्य आहे. बाजारांतलें सामान आणि वजनेंमापें बरोबर आहेत की नाहींत, हें राज्यकर्ते पाहातात, हें कृंत्य व्यापाऱ्यांच्या स्वातं- त्र्यांत हात घातल्यासारखे आणि त्रासदायक आहे असं प्र थमदर्शनीं वाटतें. परंतु, ते लोक खेरीज करून, बाकीच्या