२०१ त्याच्या मुखचर्येवरून, दुर्गुणी ह्मणाला. त्यास साक्रेटि- सार्ने असे सांगितलें कीं, पापवासना माझ्या मनांत उत्पन्न होतात खया, पण मी त्यांचें दमन करितों, आणि पुण्य- कर्में करितों. अर्से दमन सगळ्या सद्गुणी माणसांस करावें लागतें. आणि हें दमन, अप्रतिबंध स्वातंत्र्य थोडें- बहुत सोडल्यावांचून करतां येत नाहीं. आणखी, सामा- जिक नीति किंवा सुराजनीति हिचा सगळा पाया हाच आहे. जितके नीतिनियम किंवा कायदे ह्मणून आहेत, ति- तके सगळे, अप्रतिबंध स्वातंत्र्यास अवरोधक आहेत. दु- सन्याची वस्तु घेऊं नये, दुसन्यास इजा देऊं नये, दुस- प्यास फसवूं नये, हें जें ठरविलें आहे, त्याच्या योगानें अप्रतिबंध स्वातंत्र्यास व्यत्यय येतो खरा; परंतु त्याच्या योगानें माणसाची जी हानि होते, तिच्या सहस्रपट किंवा लक्षपट त्याचें हित होतें. ह्मणून, ती खरोखर हानि नव्हे. आपल्या सगळ्या पैशाचा पूर्ण उपभोग घेण्यास मनुष्यास अप्रतिबंध स्वातंत्र्य असावें हें रास्त आहे. पण, तो जर सरकारास कर देणार नाहीं, तर सरकार त्याचें आणि त्याच्या पैशाचें रक्षण करणार नाहीं; आणि अशा स्थितीमध्यें, त्यापेक्षां एखादा बलवान मनुष्य त्याचा स- गळा पैसा बुचाडून घेऊन जाईल. ह्मणजे, सगळ्याच पैशाला तो मुकेल. ह्मणून त्यानें आपल्या पैशांतला थो- डासा पैसा सरकारास देऊन, स्वस्थपणें, बाकीच्या पै- शाचा उपभोग घ्यावा, हें चांगलें. ह्मणजे, थोडेंसें स्वा- तंत्र्य देऊन, बाकीच्या सगळ्या स्वातंत्र्याचा उपभोग यथे- च्छ घ्यावयाचा, असा अर्थ होतो. त्याप्रमाणेंच, दुसऱ्यास इजा देण्याविषयीं आपल्या मनास जी वासना कधीं कधीं उ-
पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०४
Appearance