२०० • आणि कोणी कोणाच्या वाटेस जाऊं नये, हा नियम क मजास्त प्रमाणानें पाळतातच. कां कीं, त्याची उत्पत्ति मनुष्यांच्या अंतःकरणांत स्वाभाविक आहे. ह्मणजे, अ- गदीं रानटी लोकांत देखील, अगदीं केवळ नैसर्गिक मनो- वृत्तीनें, अप्रतिबंध स्वातंत्र्याचा कांहीं अंश एकीकडे ठेव- ल्यावांचून राहाववत नाहीं. ह्याचा अर्थ असा कीं, अप्र- तिबंध स्वातंत्र्य हें अमानुष आहे. किंवा, एकाद्या देशांत एक मनुष्य अगदी एकटा असावा, दुसरें कोणी माणूस असूं नये, तेथें मात्र तें चालेल; अन्यत्र चालावयाचें नाहीं. बलिष्ठानें दुर्बलावर कोणत्याही प्रकारें जुलूम क रतां कामास नये, असा जो प्रतिबंध सर्व मनुष्यसमाजांत आढळतो, तोच अप्रतिबंध स्वातंत्र्याच्या बद्धकपणाचा आरंभ होय. सगळी माणसं अत्यंत सद्गुणी आहेत, त्यांच्यांत पा- पबुद्धि मुळींच नाहीं, अशी जरी स्थिति असती, तरी दे- खील अप्रतिबंध स्वातंत्र्य त्यांच्यामध्यें राहाणें अशक्य झालें असतें. कारण की, सद्गुण ह्याचा अर्थच असा आहे कीं, जनांच्या कल्याणाकरितां, वर्तनाचे जे नियम थो- रांनीं अनादिकालापासून लावून दिले आहेत, ते पाळणें. सद्गुणी मनुष्य चोरी करावयाचा नाहीं, ह्याचा अर्थ असा कीं, त्याच्या मनांत दुसऱ्याची वस्तु त्याचे नकळत घेण्याचें जरी आलें, तरी ती तो घ्यावयाचा नाहीं. कां कीं तें वाईट आहे, हें त्याला ठाऊक असतें. ह्मणजे, तितक्याचपु- रतें त्याला आपल्या मनाचें स्वातंत्र्य एकीकडे ठेवावें ला- गतें. आणखी इतर सद्गुणांविषयीं हाच नियम कमजास्त मानानें लागू आहे. कोणी एक धूर्त मनुष्य साक्रेटिसास
पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०३
Appearance