पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९ , खावयास दिलें, तेव्हां त्यानें साठ सहस्र ऋषींस यथेष्ट भोजन दिलें. त्याप्रमाणेंच, सुदामदेवानें कृष्णाला मूठभर पोहे अर्पिले, तेव्हां त्याला द्वारावतीसारखी, अत्यंत संप त्तिमान सुदामनगरी प्राप्त झाली. ह्यांतली अतिशयोक्ति काढून टाकून केवळ तात्पर्य पाहिले असतां असे दिसतें कीं, कोणालाही झालें तरी, दिल्यावांचून मिळत नाहीं; द्यावें तेव्हां घ्यावें, असा साधारण व्यवहारनियम दिसतो. तो नियम जसा ऐहिक व्यवहारांत विद्यमान असतो, तसा पारमार्थिक व्यवहारांतही विद्यमान असतो. हा नियम स्वातंत्र्याच्या संबंधानें फार विचार करण्या- सारखा आहे. विचार करून पाहिलें असतां असें दि- सतें कीं, मनुष्यांस काय आणि इतर प्राण्यांस काय, हवें- तसै वागण्याची सवड असणें- आपल्या इच्छेच्या आड कोणीं येऊं नये असें असणें-ह्मणजे पूर्ण स्वातंत्र्य असणें, हें अत्यंत सुखावह वाटतें. आणखी हैं वाटू लागलें, कीं तें जितकें संपादवेल, तितकें संपादण्याविषयीं त्या सर्वांचे प्र यत्न चाललेले असतात. त्यांतल्या इतर प्राण्यांविषयीं येथें विचार करावयाचा नाहीं. तर, मनुष्यांविषयीं मात्र क- रावयाचा आहे. मनांत येतें तें सगळं करण्याविषयीं मोकळीक असणें, हें अप्रतिबंध स्वातंत्र्य होय. हें जनांस प्राप्त झालें अ- सतां, जिकडेतिकडे "बळी तो कान पिळी" असें व्हा- वयाचें. दुर्बलांचा नाश व्हावयाचा. हें अप्रतिबंध स्वा- तंत्र्य कधीं नांदावयाचें नाहीं, आणि नांदत नाहीं. नुष्यें कितीही रानटी असोत, त्यांच्यामध्ये देखील, एकाची वस्तु दुसऱ्यानें उगाच, विनाकारण, जबरीनें घेऊं नये म ,