पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ शेतामध्ये श्रमतां होतो व्यायाम विपुल देहातें रोगांचें मूळ सकळ अजीर्ण तें सहज की लया जातें, वायु सुनिर्मळ मिळतो तेणें होतो मनास आनंद पादपकोटिनिरीक्षण हा सुखकर लागतो मना छंद. चित्रविचित्रां वर्णां पुष्पांच्या पाहतां स्वनयनांतें होय समाधान शके वर्णाया तें नये कधीं मातें. येतो तसाच परिमळ अत्यंत मनोरम प्रचुर त्यांचा होतो हर्ष तयानें त्याचा गौरव किती करायाचा. त्यांत चमत्कृति पाहुनि मन परमेश्वरकृतीकडे वळतें तेणें त्याचें मोठेपण चातुर्यहि खरोखरी कळते. बीजांतुनि वृक्ष कसा वृक्षापासून बीज हें कैसे उत्पन्न होय आधीं कोण मग घडी बरोबर न बैसे. स्त्रीपुरुषांच्या जाती प्राण्यांसम पादपांतही असती हें अनुभवोनि बघतां कुंठित होते खरोखरीच मती. तेंचि पिकतसे क्षेत्रीं जें आपण करुनि यत्न पेरावें ह्याचा प्रत्यय येतो व्यवहारीं यावरून हेरावें. करितां प्रेम जनांवर जन करिती प्रेम आपणांवरती करितां साह्य तयांना व्यसनीं ते साह्य आपणां करिती. करितां परमेशाची भक्ति करी तो कृपा कधीं न चुके देती साक्ष महाजन आजवरी अमित जाहले तितुके. १४. याचा अनुभव घ्यावा यांतचि आयुष्य सकल खरचावें. संसारसुखा भोगुनि या पंथें सरळ नीट वर जावें. १५. ७. ८. १०. ११. १२. १३. अप्रतिबंध स्वातंत्र्य. आपल्या पुराणामध्ये द्रौपदीची गोष्ट आहे, तशी सुदा- मदेवाची गोष्ट आहे. द्रौपदीनें कृष्णास भाजीचें पान