पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९७ आले, त्यांनी डाक्टर गोपाळ शिवराम ह्यांच्या प्रकृतीस फार धक्के बसले. शेवटीं गेल्या दोन महिन्यांत त्यांची प्रकृति दिवसेंदिवस अधिकाधिक क्षीण होऊन, त्यांस गेल्या आक्टोबर महिन्याच्या चोव्विसाव्या तारखेस देवाज्ञा झाली. ही आमच्या राष्ट्राची फार मोठी हानि झाली आहे. ती लवकर भरून यावयाची नाहीं. गोपाळराव- जींस औरस पुत्र नाहीं; ह्मणून त्यांनी दत्तक मुलगा घे- तला आहे; आणि तो अल्पवयस्क आहे, ह्मणून प्रपंचाची व्यवस्था पाहण्यास त्यांनी आपली आप्तमंडळी, कायदे- शीर रीतीनें, नेमून ठेविली आहे. ती यथास्थित चालो, हे चिरंजीव आपल्या वडिलांसारखे लौकिकवान होवोत, आणि गोपाळरावजींच्या आत्म्यास स्वर्गलोकीं चिरस्थायी शांति प्राप्त होवो, असें ह्मणून, आह्मी हें अल्प चरित्र येथें समाप्त करितों. एका शेतकऱ्याचे विचार. आर्या. ● इतर व्यवसायांहुनि कृषिकर्म मला खरें भलें गमतें उत्तम हाटलें आहे तेंचि यथायोग्य होय लोकमतें. पृथ्वी पय वायु तसा प्रकाश हीं साधनें तथा असती तीं ईश्वरदत्त सकल हातीं मनुजांचिया मुळी नसती. पृथ्वी ही सर्वांची माय हिची करुनियां विमल सेवा पोट भरावें हें बहु मान्य असे मानवां तसें देवा. खोटें भाषण करणें अथवा परवंचना नको यांत शुद्ध व्यवहारानें मनुजांचे हेतु पूर्ण होतात. १. २. ४.