पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ फार गोपाळ शिवराम हे त्यांत अत्यंत प्रवीण होते. काय सांगावें, मुंबईशहरांत ह्मटले ह्मणजे बाहेरचे चांगले चांगले धन्वंतरी जमलेले आहेत, त्यांत देखील जर कठिण शस्त्र प्रयोग करायाचा प्रसंग आला, तर, ते सगळे गोपाळ शिवरामांस बोलावीत असत. मुतखडे वगैरे काढणें हे श- स्त्रक्रियेचे सामान्य प्रकार होत. परंतु, पोट चिरून आं- तलें मूल चांगलें यथास्थित बाहेर काढणें, आणि बाळवा- ळंतीण ह्रीं उभयतां सुरक्षित राखणें, हें काम ह्मटलें ह्मणजे फार धोक्याचें आहे; त्यांत देखील गोपाळ शिवरा- मांचा हातखंडा असे. असे प्रसंग एक दोन नव्हत, तर पांच चार आले होते; आणि त्या सर्वांत त्यांस उत्तम प्र कारचें यश आलें. असा त्यांचा लौकिक झाल्यावर सरकारानें ह्यांस इ० स० १८७२ ह्या वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीचे फेलो नेमिलें, आणि इ० स० १८८६ ह्या वर्षी जस्टिस ऑफू धि पीस नेमिलें. ह्मणजे सांप्रत काळीं विद्येच्या योगानें जितका मान मिळण्यासारखा आहे, तितका त्यांस मिळाला. एवढे सामर्थ्य असून, आणि त्यांस त्यांच्या धंद्यावर चांगला पैसा मिळाला असून, गोपाळ शिवरामांस गर्व कसा तो माहीत नव्हता. कोणीही बोलावो, पैशाच्या प्राप्तीचा योग असो वा नसो, रोग्याकडे जावयाचें आणि त्यास साह्य करावयाचें, हे त्यांचें व्रत होतें. शिवाय ते फार मनमिळाऊ होते; कधीं कोणाला कठोर शब्द बोलले नाहींत. ह्मणजे ते सर्व प्रकारी माणसांस हवे असे होते. परंतु, देवाच्या घरची योजना कांहीं वेगळी होती. गेल्या पांच चार वर्षीत त्यांच्या कुटुंबांत दुःखाचे प्रसंग फार