पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९५ तेथेंही त्यांस पुष्कळ बक्षिसे मिळाली. पुढे ते एल्फिन्स्टन इन्स्टि- ट्यूट ह्या विद्यालयांत जाऊं लागले. तेथेंही चांगला अ भ्यास करून त्यांनीं नांव मिळविलें. पुढे, घरच्या गरी बीमुळे, त्यांनीं रेलवेकडे एक लहानशी नौकरी पतकरली. इतक्यांत, ग्रांट मेडिकल कालेजांत पगारी विद्यार्थी घेण्याची परीक्षा झाली, तींत हे पसंत ठरले. तेव्हां सहजच त्यांचा प्रवेश त्या नामांकित वैद्यपाठशाळेत झाला. त्यांच्या बुद्धीचा प्रकाश पडला; आणि त्यांस पुष्कळ बक्षिसें मिळून, कितीएक पगारी विद्यार्थ्यांच्या जागा त्यांस मि- ळाल्या, आणि इ०स०१८६४ ह्या वर्षी त्यांस एल्. एम्. ची पदवी मिळाली. आणखी त्याच वर्षी त्यांस बाटलीवाल्यांच्या दवाखान्यांत असिस्टंट सर्जन नेमिलें. तेथलें काम संभा- ळून, त्यांनीं, मराठी विद्यार्थ्यांच्या उपयोगाकरितां, शस्त्र- वैद्यकावर एक आणि न्यायवैद्यकावर एक, असे दोन ग्रंथ लिहिले. ते फार चांगले झाले. त्यांचे हक्क, त्यांस चांगलें मोल देऊन, सरकारानें त्यांपासून घेतले. ह्याशिवाय ते वैद्यकविषयांवर प्रसंगोपात्त निबंध लिहीत असत. ते लो- कांस फार आवडत असत. वैद्यशास्त्राच्या मुख्य शाखा दोन आहेत; औषधयो- जना आणि शस्त्रप्रयोग. ह्या दोन्ही फार कठिण आहेत. पण त्यांतही शस्त्रप्रयोग फार बिकट आहे. औषधयो- जनेंतली चूक कधीं कोणास कळत नाहीं; काय व्हायाचें तें आंतलेआंत होतें. परंतु, शस्त्रप्रयोगांतली चूक ला- गलीच जवळच्या माणसांस कळते; आणि तिचे परिणाम तात्काल प्रत्ययास येतात. असा नाजूकपणा त्यांत फार आहे, ह्मणून त्यांत फारसे वैद्य तयार होत नाहींत. पण,