पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ इच्छेप्रमाणें चालत असले तरच जीवाला सुख होतें; एर- व्हीं होत नाहीं. ह्याचा अर्थ असा कीं, जीवाचें सुख शरीराच्या सुस्थितीवर अवलंबून असतें. असें जें श- - रीर - इहलोकसुखाचें एक अत्युत्तम साधन- त्याच्या व्यव हारांत जे अडथळे येतात, ते काढून टाकणें-ह्मणजे, अव- यवांचे व्यापार जीवाच्या इच्छेप्रमाणें चालत असें करणें- हैं कृत्य अत्यंत महत्त्वाचें आहे. आणखी आमचे वैद्य- जन अनेक उपचार करून जें काय करीत असतात, तें हेंच असतें. ह्मणून, वैद्यजन हे मोठे सुखदाते होत. ते वंदनास पात्र होत. अशा वंदनीय पुरुषांत श्रेष्ठ असे गो- पाळ शिवराम वैद्य हे एक गृहस्थ होऊन गेले. त्यांचें संक्षिप्त चरित्र आह्मी येथें सादर करितों. रत्नागिरी जिल्ह्यामध्यें लागवन ह्मणून एक लहानसें गांव आहे. तेथें गोपाळराव हे इ० स० १८४० च्या जानेवारी महिन्याच्या पंचविसाव्या तारखेस जन्मले. ह्यांचे आजे रामचंद्रभट्टजी हे निवर्तल्यावर, वडील शिवरामभ ट्टजी हे, घरची गरीबी जाणून, कुटुंबनिर्वाहाच्या उद्यो- गार्थ, सकुटुंब, इ० स० १८४६ ह्या वर्षी मुंबईस आले. हे पिढीजाद वैद्य होते. कोंकणांत, लागवन ह्मणजे वै- द्यकीचें अगदीं घर, अशी आख्या आहे. मुंबईस येऊन राहिल्यावर शिवरामभट्टजींनी आपल्या मुलास विद्याभ्यास करण्यास मराठी शाळेंत घातलें. तेथें थोडासा अभ्यास झाल्यावर, गोपाळराव, इंग्रजी शिकण्याकरितां, प्रभुसेमि- नरींत जाऊं लागले. तेथें त्यांचा अभ्यास चांगला चा- लला; आणि ते मोठे उद्योगी आणि बुद्धिवान् असल्याव- रून त्यांवर त्यांच्या गुरूची फार मर्जी बसली; आणि