पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डिसेंबर - १८९०. बालबोध. गोपाळ शिवराम वैद्य. जीव ही एक अप्रतिम देणगी आहे. ही देणगी दे- ण्याचें सामर्थ्य परमेश्वरास मात्र आहे, इतर कोणास नाहीं. आणखी, इतर देणग्यांचा उपभोग ह्या देणगीवर अवलंबून आहे. ही देणगी जर नाहीं, तर इतर देणग्या असून नसून सारख्याच आहेत. पण चमत्कार असा आहे कीं, ही देणगी ठेवण्यास शरीरावांचून दुसरें ठिकाण नाहीं. जी- वास राहायास शरीर पाहिजे. आणि तें शरीर यथास्थित असलें-ह्मणजे, त्याच्या अवयवांचे सगळे व्यापार जीवाच्या