पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ भावनगरचे नत्राब इंग्लिशसरकारास ह्मणतात, आमच्या सैन्यास आ- पल्या सैन्याबरोबर कोठें स्वारीस पाठवा. झणजे त्यांची चांगली तयारी राहील. खरे आहे. मोठ्यामोठ्या तोफा सोडल्यानें पाऊस पाडितां येईल, अशी जी कल्पना • एका विद्वानानें काढिली आहे, तिची प्रतीति पाहण्याकरितां अमेरिकेंत एक मंडळी स्थापित झाली आहे. इंग्लंडांत एकंदर ३०८ पेढ्या असून त्यांत आजमितीस लोकांची ठेव नव्वद कोटि पौंड आहे. पैकी सुमारें अठरा कोटींचे मालक मयत असून त्यांचे वारस कोणी नाहींत. केनसाहेब हिंवाळ्यांत इकडे येणार आहेत; आणि हिंदुस्थानांत मद्यपा- नाचा प्रतिबंध व्हावा, असे आणखी उद्योग करणार आहेत. आमचीं व्यसनें सोडवायाला देखील परके लोक पाहिजेत, आं! काय दशा आली आहे !! डा. गोपाळ शिवराम वैद्य गेल्या महिन्याच्या तेविसाव्या तारिखेस वारले. शस्त्रवैद्याच्या कामांत युरोपियन डाक्तरांत देखील ह्यांच्या बरोबरीचा कोणी नाहीं. आमच्या समाजाची मोठी हानि झाली. ऋप ह्मणून मोठे कारखानदार विलायतेस आहेत. त्यांनी रशियन सरकाराकरितां एक राक्षसी तोफ केली आहे. तिचें वजन २३५ टन आहे, कान्हा १३३ इंच रुंदीचा आहे, आणि लांबी ४० फूट आहे. एका मि- निटांत तिचे दोन वार निघतात; आणि प्रत्येक बाराला खर्च साहा हजार रुपये लागतो ! ! सगळेंच विचित्र ! आलीकडे अंबाडी, ताग, वगैरे तंतुमय पदार्थापासून कौलें, हौद, होड्या, वगैरे जिन्नस करूं लागले आहेत. ताग वगैरे घेऊन प्रथमतः त्याचे बारीक तुकडे करून चुन्याच्या निवळीत घालून उकळतात. नंतर तो कु- टून याचा लगदा झाला ह्मणजे त्यांत तुरटी घालून त्याला रंग देतात. नंतर तारांच्या सांच्यांत घालून दावून त्याचे पाहिजे ते पदार्थ करितात.