पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९ सर्प भरलेले असतात ! अशा प्रकारचे परिपाठ आमच्या हिंदुस्थानांतल्याही अडाणी लोकांत अद्याप आढळून ये- तात. विशेषेकरून कोंकणांत हें फार आहे. फार काय सांगावें ? लैस दूध देईनाशी झाली ह्मणजे कोणीं तरी भुताटकी केली असें ते समजतात. आणि ती काढून तशीच कोणी बाई टाकण्याचे उपाय करूं लागतात. सोहेरांतच मेली, तर ती डांकीण होते, आणि माणसांस लागते असे समजतात. त्याप्रमाणेच हेतु मागें राहून कोणी मेला असतां, तो ग्रह होतो, आणि माणसांस पीडा देतो, असें मानितात. आणखी त्याला नारळ नैवेद्य कांहींतरी देऊन संतुष्ट करणे आवश्यक आहे, असं त्यांच्या मनांत भरलेलें आहे. पण हा सगळा भ्रम आहे. रोगाचीं खरीं कारणें हीं नव्हत. . तर मग रोगाचीं खरीं कारणे ह्नटलीं ह्मणजे, त्यांत पहिलें घाणेरडेपणा होय. घर निर्मळ आणि सुखावह होण्यास ज्याप्रमाणे त्यांतला केरकचरा काढून बाहेर दूर नेऊन टाकिला पाहिजे, आणि त्याच्या मोन्यांचें पाणी बाहेर काढून दिले पाहिजे, त्याप्रमाणें, शरीर स्वच्छ ह्मणजे निरोगी राहण्यास त्यांतला घाणेरडेपणा नेहमीं काढून टा किला पाहिजे. रोज स्नान करून आंग स्वच्छ ठेवावें, आणि आंगावरचे कपडे चांगले धुवून वाळवून घालीत जावें. आणखी त्याप्रमाणेंच, कच्चीं फळें, शिळें, बुरसलेलें अन्न, किंवा कुजलेले पदार्थ कधीं खाऊं नयेत. तसेंच, वाईट पाणी पिणें हें दुसरें कारण आहे. आपल्या श रीरांत पाणीच पुष्कळ आहे. वाईट पाणी पोटांत गेलें ह्मणजे तें रक्तांत मिसळून सगळ्या शरीरांत पसरतें; आणि श .