पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० तें वाईट असल्यामुळे प्रकृतीस आवडत नाहीं; आणि त्यास बाहेर टाकण्याचा प्रयत्न प्रकृति करिते; तेंच दुखणें होय. वाईट खाण्याचा प्रकारही शरीरांत असाच होतो. ह्मणून, प्रकृतीस मानवेल असें अन्नपाणी घ्यावें. आणखी तिसरें कारण वाईट हवा आहे. ती वाईट हवा, वाईट पदार्थांच्या योगानें होत असते. गांवांतली हवा गांवां- तल्या वाणीनें बिघडते. ह्मणून, गांवाबाहेर जाऊन चांगली हवा घेण्याचा परिपाठ ठेवावा. शिवाय, हवेचें आणखी असे आहे कीं, आपण श्वासाबरोबर जी हवा आंत घेतों, ती जरी चांगली निर्मळ असली, तरी बाहेर टाकतों, ती हवा बाणेरी असते, आणि ती आपल्या सभों- वतालच्या हवेंत मिसळते. ह्मणजे, धुण्याचें, किंवा भांडीं वांसल्याचे पाणी सगळ्या प्यावयाच्या पाण्यांत मिस- ळावें, असें होतें. तें फार बाधतें; आणि तें गांवांत फार होतें; ह्मणून स्वच्छ हवा घेण्यास गांवाबाहेरच गेलें पा- हिजे. आणखी, सगळ्यांत मुख्य आणि मोठें कारण अ ज्ञान होय. औषधावर कांहीं नाहीं, प्रारब्धीं असेल तें वडेल, असें मानिल्याच्या योगानें पुष्कळ लोकांस नाना प्रकारच्या रोगांपासून विपत्ति भोगाव्या लागत आहेत. परंतु रोगांच्या खन्या कारणांचें ज्ञान आमच्या आधुनिक विद्वानांस झाले आहे. तर त्यांनी आपल्या भाषणांनी आणि कृतींनी रोगांच्या संबंधाचें अजाणपण इतर लोकांतून का- ढून टाकण्याचा प्रयत्न नेहमीं केला पाहिजे. हें त्यांचें अ- वश्य कर्तव्य आहे. तें त्यांनीं आस्थेनें करावें.