पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ त्या आजारी पडून त्याचें कांहीं दुखूंखुपूं लागलें ह्मणजे, आंत सरडा शिरून खुरपीत आहे, असें ते ह्मणतात. द क्षिण आफ्रिकेंतल्या रानटी लोकांत कोणी आजारी पडला ह्मणजे असे समजतात कीं, त्याच्यावर कोणीं तरी चेटक केलें आहे. आणि तो चेटक्या हुडकून काढण्याकरितां पंचा- क्षऱ्यांस बोलावून आणितात. ते आजारी माणसाला औषध कधींच देत नाहींत. एकदा त्यांच्या राजाला फार सरदी झाली. तेव्हां पंचाक्षयानें असें सांगितलें कीं, त्यास अमक्या अमक्या ह्यातायानें चेटक केलें आहे. बिचाऱ्या ह्यातायास त्या लोकांनीं ठार मारिलें. सैबीरिया देशांतले कांहीं लोक असे समजतात कीं, एकादा दगड किंवा कांटा आंगांत घुसून जसें देहास दुःख होतें, तसं भूत आंगांत शिरतें आणि दुखणें येतें. त्या लोकांचे उपाध्ये तीं भुतें काढीत असतात. तीं काढण्याकरितां, ते त्या रोग्यांस आपल्या पांवरुणांत घेऊन पुष्कळ छांछूं करितात. सीलोन येथलेही मूळचे राहाणारे लोक असेच अज्ञान आ- हेत. ते अद्यापही त्या देशांत कोठें कोठें आढळतात. त्यांचा ग्रह असा आहे कीं, दुखणें येतें तें भुतांनीं येतें; दुसऱ्या कशानेंही येत नाहीं. ह्मणून त्यांच्यांतल्या दुखणे- कन्यास कोणी औषध देऊं लागलें तर ते त्यास हंसतात. ते ह्मणतात, भुताला एरंड्येल तेल काय करील ? तेथेंही पंचाक्षऱ्यांचें बंड फार मोठें आहे. ते भुतांची भयंकर चित्रे काढून दाखवून अजाण लोकांस भिववितात. ते एका भुताचें असे चित्र काढीत असतात की, त्याला दोन अक्राळविक्राळ तोंडें- एकाखाली एक अशीं-असून, त्यांत भले मोठे दांत असतात, आणि त्याच्या सर्वांगावर