पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८७ क्सिको व पेरू या देशांत पुष्कळ सांपडतें. युरोप खंडां- तही पुष्कळ ठिकाणीं सांपडतें. हा धातु प्राचीन काळीं आपल्या देशांत कोठून येत होता, तें समजत नाहीं. परंतु, मैसूर प्रांतांत, धारवाड जिल्ह्यांत अजमिराजवळ वगैरे रुप्याचे दगड सांपडतात. रुप्याचा रंग चमकदार पांढरा असतो. त्याचें नाणें पाडण्यास त्यामध्यें तांब्याची भेळ घालून तें कठिण क रावें लागतें. हिंदुस्थानांतल्या नाण्यांत शेंकडा सुमारें १२ प्रमाणानें तांब्याची भेळ असते. सरकारच्या टंकसाळेत निवळ चांदी किंवा रुपें नेऊन दिलें तर, कांहीं नियमाप्र- माणें त्यांत तांबें घालून त्याचें नाणें फुकट पाडून देतात. रोग होण्याची कारणें. सर्व गोष्टींत परमेश्वराची इच्छा आहे; तेव्हां ती प्रा- ण्यांच्या आरोग्यांतही आहे, हे उघड आहे. पण, त्यांतही रोग होण्यास कारणें भलभलतीं समजणें हैं वेडेपण आणि दुःखास कारण आहे. ह्मणून तीं टाळिलीं पाहिजेत, आणि खरीं कारणे समजून घेऊन, तीं नाहींतशीं कर- ण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आतां प्रथम भलतींच कारण कोण कशीं समजतात ती पाहा. दक्षिण पासिफिक महासागरांत कांहीं बेटां- मध्यें अगदी रानटी लोक राहातात. त्यांस असे वाटतें कीं, मनुष्यास कितीही जरी ह्मातारपण आलें, तरी आपोआप मरण यावयाचें नाहीं. आणि कांहीं जखमबिखम न होतां, एकादा मनुष्य मेला, ह्मणजे ते असे समज- तात कीं, त्यास कोणी तरी जादू करून मारिलें. मनुष्य ●