पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गंधकाशीं संयोग पावलेलें रुपें त्या गंधकापासून सो- डवून वेगळें काढण्यास पहिल्यानें तो पदार्थ पाण्यांत कुटून, साधारण मिठांत मिसळून, तें मिश्रण दिवस २ दिवस त- सेंच ठेवितात; नंतर त्यांत पारा घालून तें सगळें चांगले मिळ- ण्यासाठीं खूब तुडवितात; आणि मग तो चिखल पाण्यानें धु- तला ह्मणजे हलकी माती निघून जाऊन रुपें व पारा ह्यांचें मिश्रण खालीं राहातें. तें मिश्रण तापविलें ह्मणजे पाण्याची वाफ होऊन रुपें खालीं राहातें. पुष्कळ ठिकाणीं रूपें शि- शाशीं युक्त झालेलें सांपडतें. अशा प्रसंगी त्या शिशांतून तें रूपें काढून घेतात. ती कृति अशी:-तें शिसें एका मोठ्या भांड्यांत घालून त्याचा रस करितात, आणि तो रस हळूहळू निवूं देतात, ह्मणजे त्याचे हळूहळू स्फटिक बनूं लागतात. अगदी पहिल्यानें, ह्मणजे तो रस फार निवण्याच्या आधीं, जे स्फटिक बनतात, त्यांत बहुतकरून शुद्ध शिसे असतें. हे स्फटिक झायनें काढून घेतले ह्मणजे, बाकी जो रस राहातो, त्यांत पुष्कळ अंश रुप्याचा राहातो. नंतर हा रस घेऊन एका उ थळ भट्टींत घालितात, आणि तो तापून लाल झाला ह्मणजे, त्याच्या पृष्ठभागावर भात्यांनी मोठ्या जोरानें हवा खेळवि- तात. ह्मणजे त्या हवेंतला आक्सिजन वायु भराभर त्या रसां- तील शिशाशी संयोग पावून, त्यापासून शिशाचा आक्साइड ह्मणजे मुरदारशिंग बनतें; व त्या रसांतलें रुपें तसेंच मागें राहातें. आणि ह्याप्रमाणे त्यांतले सगळे शिसें आक्सिजन वायूशीं संयोग पावल्यावर खाली निवळ रुप्याचा रस रा- हातो. तो खालून तोटीनें काढून घेतात. रुपें बहुतकरून अमेरिकाखंडांत युनैटेड् स्टेट्स्, मे-