पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८५ प्रकारच्या कातड्याच्या पिशवींत घालून ठोकून ठोकून पातळ करावा लागतो. सोन्याची तारही फार बारीक निघते. अर्ध गुंज सोन्याचें सूत ३६४ फूट लांब काढितां येतें. हें सूत रुळांच्या मध्ये घालून चपटें करितात, आणि यं- त्राच्या योगानें पिवळ्या रंगाच्या रेशिमाच्या धाग्याभोंवतीं गुंडाळतात. यालाच कलाबतू ह्मणतात. ह्या कलावतूचे जर वगैरे करितात. हवेनें किंवा पाण्यानें सोनें बिलकुल बिघडत नाहीं. त्याच्यापुढे साधारण आसिडांचें कांहीं चालत नाहीं. तें विरघळण्यास नैत्रिक व हैद्रोक्लोरिक ह्या आसिडांचें मि- श्रण घ्यावें लागतें. आणि ह्याप्रमाणें सोनें विरघळल्यावर, तो द्रव बराच उष्ण केला ह्मणजे, मागें एक तांबडी लाल भुकटी राहाते. ही भुकटी व सोडाखार ह्यांचा द्रव पाण्यांत करून जर त्यांत तांब्याचे साफ केलेले जिन्नस घालून उक ळले, तर त्या जिनसांवर सोन्याचा मुलामा बसतो. नाणें शुद्ध सोन्याचें केलें तर तें लवकर झिजतें, व वेडेंवांकडें होतें; ह्मणून नाणें पाडण्याच्या अगोदर सो- न्यांत रुप्याची किंवा तांब्याची भेळ घालतात. - रुपें. - ह्या धातूचा उपयोग नाणें व दागिने कर- ण्यांत, मुलामा देण्यांत, फोटोग्राफ काढण्यांत व तशाच श्रीमंतांकडचीं स्वयंपाकाचीं व जेवणाखाणाची भांडी तयार करण्यांत होत असतो. हैं अगदीं शुद्ध बहुतकरून सांपडत नाहीं. कारण, ह्याला गंधकाचें आकर्षण फार असल्याच्या योगानें तें ब- हुतकरून, जमिनींतल्या गंधकाशी संयोग पावलेलें सांप- डतें. तें कधीं कधीं क्लोरिन, ब्रोमिन किंवा आयोडिन ह्या शुद्ध पदार्थीशीं संयुक्त झालेले आढळतें.