पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ , रेतींतून काढितात तेव्हां ती रेती वरचेवर धुवावी मात्र लागते. एकाद्या भांड्यांत ती रेती व पाणी घालून तें सर्व जोरानें ढवळतात. ह्मणजे, सोन्याचे कण जड असल्यामुळे खालीं बसून बाकीची वाळू वर राहाते; मग वरचें पाणी ओतून दुसरें पाणी घालतात; आणि पुनः ढवळतात. असं वरचेवर केल्यानें, निवळ सोन्याचे कण खालीं राहातात. बहुतेक सर्व सोनें ह्याच रीतीनें काढिलें असतें. हल्लीं फार सोनें सांपडतें असे देश ह्मटले ह्मणजे आस्ट्रेलिया आणि क्या- लिफोर्निया हे होत. त्या दोन्ही देशांत, ह्या दुसऱ्याच रीतीनें सोनें काढितात. कारण, ह्या देशांत, फार प्राचीन काळापासून वाहात आलेल्या नद्या आहेत; त्यांनीं आपणांबरोबर आणि- लेल्या सुवर्णयुक्त दगडांच्या वाळूचे थरांवर थर बसले आहेत; आणि याप्रमाणें सुवर्णमृत्तिकायुक्त असे अफाट प्रदेश तयार झाले आहेत. त्या प्रदेशांत जमिनीवर पाण्याचा झोत सोडून तें गढूळ झालेले पाणी कोंड्यांतून नेलें, ह्मणजे सोन्याचे कण खालीं बसण्यास बिलकुल प्रयास पडत नाहींत. आपल्या हिंदुस्थानांतही सोनें बऱ्याच जागीं सांपडतें; परंतु तें पुष्कळ सांपडत नसल्यामुळे सोनें काढण्याचा धंदा चांगला वाढत नाहीं. मद्रास इलाख्यांत वन्याड, मैसूर, सालेम वगैरे ठिकाणी हल्लीं बरेंच सोनें सांपडतें आहे. तें शिशा- सोन्याचा रंग चमकदार पिंवळा असतो. सारखें मऊ असून, त्याच्या इतका घनवर्धनीय दुसरा को- णताही धातु नाहीं. त्याचा वर्ख इतका पातळ करितां येतो कीं, त्या वर्खाच्या दोन लक्ष पानांची एकंदर जाडी एका इंचापेक्षा जास्त होत नाहीं ! ! हा वर्ख करण्यास सोन्याच्या लगडीचा प्रथमतः पातळ पत्रा करून, तो एका