Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८३ सोनें आणि रुपें. उपयो- ह्या पृथ्वीवर जे धातु सांपडतात, त्या सर्वांत, व्यवहा रामध्यें, सोनें आणि रुपें ह्यांस उंची मानितात. गाच्या मानानें पाहिलें असतां, लोखंडाच्या पुढे हे धातु कांहींच नाहींत; परंतु त्यांच्या कांतीच्या योगानें आणि दुर्मिळतेच्या योगानें त्यांस महत्त्व आले आहे. आणि सर्व सुधारलेल्या देशांत श्रमाचा साधारण मोबदला सोन्यारु- प्याच्या नाण्यानें होत असल्यामुळे ह्या धातूंस विलक्षण प्रकारचें महत्त्व प्राप्त झालें आहे. ह्मणून त्यांच्या उत्पत्ती- विषय वगैरे थोडीशी माहिती असणें जरूर आहे. सोनें. - हा धातु रुप्याच्या सुमारें वीसपट मोलवान आहे. तो फार प्राचीन कालापासून माणसांस ठाऊक आहे. पृथ्वीच्या पाठीवर वेदांसारखीं जीं अत्यंत प्राचीन पुस्तकें आहेत, त्यांत देखील सोन्याचें वर्णन आढळतें. हा धातु बहुतकरून सर्व देशांत सांपडतो. स्वाभाविक स्थिती- मध्यें तो बहुतकरून थोड्याशा रुप्याशीं संयुक्त झालेला अ सतो. हा धातु खाणींतून किंवा कितीएक नद्यांच्या वाळूंतून काढितात, खाणींतून काढितात, तेव्हां ज्या गारेच्या दग- डांत त्याच्या शिरा आढळतात, ती गार यंत्रांनीं कुटून तिचें चूर्ण करितात, आणि मग तें चूर्ण पाण्यानें धुतात. अर्से केल्यानें, सोन्याचे कण व त्यांना चिकटलेली रेती, हीं जड असल्यामुळे तळीं राहातात. नंतर त्या तळीं राहि- लेल्या रेतींत पारा मिळवून, तें सर्व चांगले ढवळतात; ह्म- णजे तो पारा त्या रेतींतल्या सोन्याशीं संयोग पावतो. आणि मग तो पारा वेगळा काढून त्यास आंच दिली ह्म- णजे तो उडून जाऊन सोनें बाकी राहातें. सोनें नद्यांच्या