पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ चार विसा मिळुनि ऐशीं, जीव होतो कासाविशी जीवनाविण मासळी जैशी, जीव होतो कासाविशी, सा० ७. वर्षे झाली की नव्वद, वाचे निघेना हो शब्द रांडा पोरें ह्मणती प्रसिद्ध, कधीं तुटेल याचा बंध, सा० ८. शतमान पुरुष झाला, जन्म वायां व्यर्थ गेला रामदास सावध झाला, हरीभजनीं लागला, सा० ह्या सगळ्या व्याधि टाळून समर्थ हरिभजनीं लागले, ह्याचा अर्थ, सगळं सोडून देऊन हरि हरि ह्मणत बसले, असा ध्यावयाचा नव्हे. कां कीं, त्यांनी आपले आयुष्य दास- बोधादि उत्तम ग्रंथ, जनांचे डोळे उघडण्याकरितां लिहि- ण्यांत घालविलें. ह्मणजे, पर्यायेंकरून असें ह्मणावयाचें कीं, ते एकसारखे वाचीत होते, आणि त्यांत त्यांस जें जें कांहीं जनांस कळविण्यासारखें दिसत होतें, तें तें ते त्यांस सां- गत होते. आणखी ह्यांतही वाचीत होते ह्मणजे कागदाव- रचीं अक्षरें ओळखीत होते, असा अर्थ घ्यावयाचा नव्हे, तर सृष्टीचें अवलोकन करीत होते, असा अर्थ घ्यावयाचा. एका तत्त्ववेत्त्यानें झटले आहे की, "सृष्टि हें ईश्वरलिखित पुस्तक आहे." तें खरें आहे. आणि आपणास साधारणपणे असे ठाऊक आहे की, ग्रंथकार तसा उत्तम असला, ह्मणजे तो वाचणान्यास, निदान वाचीत असतो तोपर्यंत तरी, आ- पणासारखें करितो, आपल्या वळणावर नेतो. ह्मणून, सृष्टि ह्या पुस्तकाच्या अवलोकनानें आपणांस परमेश्वराचें वळण लागावयाचें आहे. याकरितां आह्मी असें ह्मणतों की, वांचावें आणि वाचावें हेंच काय तें जन्मसार्थक्य आहे. तें करवेल तितकें करावें. 6 ९.