पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ दुसरा ग्रंथ समजला - किंवा एकाददुसरा विषय समजला, ह्मणून, त्यानें आपणास मोठा विद्वान् समजून गर्व क शाला करावा ? पैसा दोन पैसे हाती आले ह्मणजे कुबे - रासारखें फुगणें, हें वेडेपण आहे; त्याप्रमाणे आपण कितीही जरी ज्ञान संपादिलें, तरी, तें, सर ऐझाक न्यूट- नानें झटले आहे त्याप्रमाणे, ज्ञानसागरांतल्या अत्यंत सूक्ष्म- कणाप्रमाणें आहे. त्यावरून फुगणें हें वेडेपण आहे. आणखी अशा प्रकारचें वाचणें पुष्कळ होण्यास वां- चर्णे पुष्कळ झाले पाहिजे. तें कोठें आहे ? मनुष्याच्या आयुष्याकडे पाहावें तों, त्याच्या मागें वेगळ्या वेगळ्या स्थितींत वेगळ्या वेगळ्या व्याधि लागलेल्या आहेत. ह्या- विषयीं समर्थांनीं ह्मटलें आहे:- - . पद. सावधान सावधान, वाचे बोला राम राम, सावधान, ध्रु० दहा वर्षे अज्ञान, वीस वर्षे तारुण्य अंगीं भरलासे मदन, मग कैचें ब्रह्मज्ञान, सा० तीस वर्षे पुरीं होती, पुत्रा बाळा लागे प्रीती त्याची पडतसे भ्रांति, मग कैची आत्मप्राप्ती, सा० चाळीस वर्षे झालीं, डोळां चाळिशी आली न दिसे असतां जवळी, नेत्रांशीं भूल पडली, सा० पन्नास वर्षे होती, दंतपंक्ति हालताती १ शामकेश शुभ्र होती, त्याला ह्यातारा ह्मणती, सा० साठीची बुद्धि नाठी, हाती घेवोनियां काठी वसवसा लागे पाठी, त्याला हांसती कारटी, सा० सत्तरीची हो रचना, बसल्या जागा ऊठवेना गळाले हातपाय, मग दिसतो दैन्यवाणा, सा० २. २. ३.