पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० प्राण्यांपेक्षां मनुष्य श्रेष्ठ कां झाला आहे ? त्यास त्यांपेक्षां अधिक चांगलें वाचतां येतें ह्मणून. त्याप्रमाणेंच कालि- दास, लार्ड बेकन इत्यादि माणसांस इतर माणसांपेक्षां जें श्रेष्ठत्व मिळाले आहे, त्याचें कारण काय ? त्यांस इतर माणसांपेक्षां अधिक चांगलें वाचतां आलें ह्मणून. अशा प्रकारचें वाचतां येणें ह्मणजे, क्रिया काय झाली एव- ढेंच समजणें नव्हे, तर, क्रियेचा हेतु समजणें, हेंही होय. लाहान मुलें खुळखुळे वाजवीत बसतात, आणि खुळखुळे विकणारा ह्मातारा माणूसही रस्त्यांत खुळखुळा वाजवीत हिंडत असतो. ह्या दोन्ही क्रिया एकच आहेत. त्या नुसत्या समजणें, हें कांहीं पुरतें वाचर्णे नव्हे; तर, त्यांचे हेतु समजणें, हें वाचणें आहे. • परंतु, वाचणें ह्याचा साधारण अर्थ लोकांत समज- तात, तो घेतला असतां देखील असे दिसतें कीं, जें काय आजपर्यंत लिहिलें आहे, तें सगळें जर घडलेल्या गोष्टींचें वर्णन आहे, तर तें एक मोठें अवाढव्य अनंत असें ज्ञान- भांडार आहे. पृथ्वीवरच्या सगळ्या भाषांतले सगळे ग्रंथ जर एकत्र केले, तर त्यांची रास एकाद्या मोठ्या डोंगरा- एवढी होईल; आणि त्यांतले विचार जर एकाद्या विश्व- कर्म्यास कधीं एकत्र करितां आले, तर, ते, हजार दोन हजार बृहस्पति तयार होण्यास सहज पुरतील ! केवढें प्रचंड प्रकरण आहे ! हें ग्रंथविश्व सिद्ध होण्यास व्यास- वाल्मीकीसारख्या हजारों महान् महान् विद्वानांचे परिश्रम आज लक्षावधि वर्षे चालले आहेत. त्यांचें आकलन, अल्पबुद्धि मनुष्याच्या हातून, त्याचें आयुष्य सगळें पन्नास साठ वर्षे त्यांत, कसं व्हावें ? आणखी, त्यांतला एकादा