पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७९ बैलांच्या आणि मेंढरांच्या मनांत उभा राहातो. सर ऐझाक न्यूटन ह्यानें, झाडावरचें फळ खालीं पडतांना पा हिलें; तें त्यानें वाचिलेंच ह्मणावयाचें; आणखी त्यावरून त्याच्या मनांत असें ठसलें कीं, तें फळ कांहीं आपोआप खालीं आलें नाहीं; कां कीं, तें अचेतन आहे, त्यास को- णताच व्यापार स्वतः करण्याचें सामर्थ्य नाहीं; तर, तें फळ पृथ्वीनें आपणाकडे ओढून घेतलें; हें ह्मणजे तिनें स्वेच्छेनें केलें असें नव्हे; कां कीं तीही अचेतन आहे- तिलाही कोणता एकादा व्यापार स्वतःसिद्धपणें करण्याचें सामर्थ्य नाहीं; परंतु, सर्व पदार्थांनी एकमेकांना ओढीत असावें, असा जो एक नियम विधात्यानें लावून दिला आहे, त्याच्या अनुरोधानें ती गोष्ट झाली आहे. हा इतका अर्थ न्यूटनाच्या मात्र मनांत आला, आणि त्याच्या वेळेपर्यंत दुसऱ्या कोणास सुचला नाहीं, ही बुद्धीची गोष्ट आहे. एकाद्या उत्तम कवितेचा खरा हृद्गतार्थ, साधारण प्रतीच्या लोकांच्या लक्षांत येत नाहीं, आणि तो एकाद्या मार्मिक विद्वान् रसिकास मात्र कळतो, तसा हा प्रकार आहे. ह्यावरून मुख्यत्वेंकरून सांगावयाचें एवढेंच कीं, का- गदावरचीं किंवा दुसऱ्या कशावरचीं अक्षरें ओळखणें एवढाच काय तो अर्थ वाचणें ह्या शब्दामध्यें येतो, असें समजावयाचें नाहीं. तर जें जें काय दृष्टीस पडतें, तें तें बरोबर पाहतां यावें, आणि त्याचा हेतु चांगला समजावा, इतका अर्थ वाचणें ह्यामध्यें ध्यावा, हें बरें. आणखी, हें वाचणें ज्या प्राण्यास ज्या मानानें येत असतें, त्या प्रा- ण्याची योग्यता त्या मानानें ह्या जगांत राहाते. इतर