पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ स्थिर सुख अथवा हें दुःख कोठेंहि नाहीं प्रचलित असतें तें बापुडें सर्व कांहीं ह्मणुनि सुमति हर्षा वा कधींही न शोका न गणिति सहसा हा वाटतो मार्ग चोखा. शुभ अशुभ न जाणे दीप गेहीं स्मशानी तमनिरसनकर्मा आपुल्या मुख्य मानी धरुनि पथ तयाचा या धरित्रीं रहावें अनुसरुनि सुधर्मा सर्व कार्यों वहावें. धरुनि भरंवसा श्रीदेवसत्तेत सारा पळपळ विसरावा या जगाचा पसारा सुख विपुल तयानें लाधतें दुःख जातें अनुभव कथिताती साधु ज्यां विश्व गातें. ह्म- पुष्कळ वांचावें आणि पुष्कळ वाचावें. वाचण्यासारखा उत्तम व्यवसाय दुसरा नाहीं. वाचणें हे सर्व ज्ञानाचें आणि सर्व सुखाचें मूळचीज आहे. णून, यच्चयावत् सर्व जीवांस वाचतां यावें, अशी योजना परमेश्वरानें करून ठेविली आहे. वाचतां येत नाहीं, असा एक देखील प्राणी ह्या जगांत नाहीं. हात उगार- लेला पाहिल्याबरोबर कुत्रें दूर पळतें; काठीला हात घा- तलेला पाहिल्याबरोबर गाडीचे बैल लवकर लवकर चाल- तात; आणि लांडगा पाहिल्याबरोबर मेंढ्या पळायला लागतात; ह्याचें पर्यवसान सूक्ष्म दृष्टीने पाहिले असतां असे दिसतें कीं, लिहिलेला ओळखीचा शब्द दृष्टीस पड- ल्यावर जसा त्याचा अर्थ मनुष्याच्या मनांत येतो, तसाच, त्या त्या क्रिया दृष्टीस पडतांक्षणी त्यांचा अर्थ कुत्र्यांच्या,