पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७७ येणेंप्रमाणें आपलें काम इमानानें बजावीत असतां, मि. नैट हे तारीख २७ माहे जानेवारी सन १८९० रोजीं म रण पावले. मि. नैट ह्यांसारखा माहितगार, अश्रांत श्रम करणारा, सरळ, व अन्याय सांपडेल तेथून हुडकून काढणारा मनुष्य आह्मां लोकांमध्ये तर क्षणभर असो, परंतु युरोपियन लोकांतही सांपडणें फार कठीण आहे. त्यांनीं आपलें आयुष्य हिंदुस्थानाच्या लोकांच्या हिताकरितां खर्चिलें, आणि आमच्या एतद्देशीय वर्तमानपत्रकर्त्यांच्या पुढे एक उत्तम कित्ता घालून ठेविला आहे. तो त्यांनी मनापासून वळवावा, ह्मणजे ते कृतार्थ होतील. सुख आणि दुःख. श्लोक. दिवस रजनि येती एकएक क्रमानें सुख असुख तशीं हीं या जगीं त्याप्रमाणें नियमन कवणाही ये न टाळावयाला निमुट ह्मणुनि व्हावें सिद्ध भोगावयाला. बहुपरि सुख होतें या जगामाजि जेव्हां लवकर समजावें दुःख येणार तेव्हां दृढतम विधिनें ही लाविली होय पाळी सकलहि मनुजांच्या लेखिलें हें कपाळीं. कठिण समय येतां घाबरें चित्त व्हावें किमपिहि न करावें तें चुकोनी करावें बहुत सहज होते संकटा वृद्धि तेणें ह्मणुनि न सहसा है घाबरूं चित्त देणें. २. ३.