पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नैट ह्यांनी ह्या देशाचें हित अनेकप्रकारें केल्याबद्दल त्यांस एक मानपत्र देऊन त्यांस बक्षिसादाखल कांहीं रकम द्यावी असें ठरलें. आणि त्याप्रमाणें मे महिन्याच्या १२ व्या तारिखेस तें मानपत्र व सुमारें एक लाख रुपयांची रकम त्यांस दिली. ह्या देशस्थितीच्या संबंधानें विचार करण्यास लोकसंख्या, व्यापार, इत्यादि गोष्टींविषयीं रोखठोक आंकड्यांची मा- हिती आवश्यक लागते; आणि त्या आंकड्यांवरून खरी देशस्थिति जाणण्यास एकप्रकारचें चातुर्य लागतें. कामांत मि. नैट ह्यांचा हातखंडा होता. हें बंगालस- रकारानें जाणून त्यांस त्या संबंधाच्या एका खात्याचे अंडर सेक्रेटरी नेमिलें. परंतु, सन १८७७-८ सालच्या दु- प्काळाच्या संबंधानें मि. नैट ह्यांनी आपल्या " आग्रिक- ल्चरिस्ट " ( शेतकरी ) नांवाच्या पत्रांत लार्ड नार्थब्रुक ह्यांच्याविरुद्ध खरमरीत टीका केल्यावरून सरकारी अधि- कान्यांस राग आला, आणि मि. नैट ह्यांनीं आपली जागा सोडून दिली. नंतर कांहीं दिवसपर्यंत ते विलायतेस गेले, आणि सन १८८३ ह्या वर्षी परत येऊन त्यांनीं कलकत्त्याचें " स्टेट्- समन अँड फ्रेंड आफ इंडिया " नांवाचें पत्र आमरण चा- लविलें. तें पत्र चालविण्यांत देखील त्यांनी आपलें धैर्य, स्वातंत्र्य, आणि माहिती मिळविण्याची पराकाष्ठेची खटपट, हीं प्रदर्शित केलीं. इल्वर्ट बिलाच्या वेळेस, कलकत्ता शहरांतले, किंबहुना सगळ्या हिंदुस्थानांतले युरोपियन लोक खवळून पिसाळल्यासारखे झाले होते; परंतु मि. नैट ह्यांनीं आपलें चित्त स्थिर ठेवून पत्रकर्त्याचें काम चालविलें. 1