Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७५ पाहावेनात. कमिशनाच्या अन्यायानें सगळा देश हैराण होऊन गेला होता, आणि लोकांच्या मनांत सरकारावि- पयीं त्वेष उत्पन्न झाला होता. ह्मणून, त्यांनीं अतोनात श्रम करून त्या विषयाची उत्तमप्रकारची माहिती मिळ- विली, आणि सरकारानें आपल्या कृत्यांचें समर्थन कर ण्याकरितां, जुन्या लेखांचा भलभलता अर्थ केला होता, आणि कांहीं गोष्टींवर पांघरूण घातलें होतें, तें सर्व त्यांनीं बाहेर काढून "बांबे टैम्स " पत्रांत सरकारावर अशी च रचरीत टीका केली कीं, त्यांस इनामकमिशन लागलेंच बंद करावें लागलें. तेव्हां राबर्ट नैट ह्यांवर देशांतल्या लोकांनीं स्तुतिस्तोत्रांची जणूं काय वृष्टि केली. ती अ- गदीं यथार्थ होती. आणि इनामकमिशन हैं उगाच त्रास- दायक विघ्न होतें, हें सरकारच्याच कृतीवरून स्पष्ट झालें आहे. आणखी, चुकीचा प्रकार राज्यांत झालेला जर कोणीं चांगल्या प्रकारें सरकारच्या नजरेस आणिला, तर, त्याचें निवारण सरकार करतें, हीही गोष्ट ह्यावरून दिसून आली. ही सरकारास भूषणावह आहे. इनामकमिशनाची व्यवस्था लाविल्यानंतर, मि. नैट ह्यांनीं, हिंदुस्थानाचा पैसा विलायत सरकारच्या कामास लावणें, निळीची लागवड करणाऱ्या युरोपियन लोकांकडून गरीब बिचाऱ्या मजुरांवर होतो तो जुलूम व त्यापासून उत्पन्न झालेले तंटे, इत्यादि विषय हातीं घेतले. त्यांतही त्यांनीं आपली न्यायप्रीति, उत्तमप्रकारें प्रदर्शित केली. निर्भीडपणा व स्वातंत्र्य हीं सन १८६४ ह्या वर्षी ते विलायतेस जावयास नि- घाले. तेव्हां मुंबईत एक मोठी सभा भरून, तींत, मि.