पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ बाडीनें मिळविलेली आहेत, ह्मणून सर्व इनामदारांच्या सनदा वगैरे तपासून पाहिल्या पाहिजेत, हें निमित्त दा- खवून इनामकमिशन नेमिलें. परंतु खरें कारण निरा- ळेंच होतें. सरकारांत पैशाची टंचाई होती, आणि पैसे पुष्कळ पाठवा अशा मागण्या विलायत सरकाराकडून वा रंवार येत असत. आणखी उत्पन्नास तर मार्ग दिसेना. तेव्हां इनामदार सरकारच्या डोळ्यांत खुपूं लागले. परंतु, त्या कायद्याचा अमल अत्यंत सक्त रीतीनें चालवून सुद्धां, लबाडीनें मिळविलेलीं ह्या सबबीवरून शेंकडा दाहा इनामें देखील सरकारास जप्त करितां आलीं नाहींत ! ह्या इनामकमिशनाची काम चालविण्याची रीत फारच विलक्षण होती, इनामदाराला नोटीस देऊन त्याजकडून त्याच्या इनामासंबंधाचे सर्व कागदपत्र आपल्या ताब्यांत घ्यावयाचे, कधीं कधीं तर त्याच्या घराची कुलुपें फोडून ते आपल्याकडे आणावयाचे, आणि मग, हरतरहा करून, इनामें लबाडीनें मिळविलेली आहेत, किंवा तीं पेशव्यांनी जप्त केलीं होतीं, किंवा दत्तविधानास सरकारची मंजुरी घेतली नव्हती, अशी अनेक कारणें लावून, तीं लागलींच जप्त करावयाचीं, किंवा त्यांच्या संबंधानें अशा कांहीं अटी घालून ठेवावयाच्या कीं, वीस किंवा पंचवीस वर्षांनीं तीं सरकारांत आपोआप जप्त झालींच पाहिजेत !! ह्या खटल्यांत इनाम- कमिशन वादी असून, तेंच न्यायाचें काम करी !! इना- मदारांना पुण्याचें दप्तर पाहूंही देत नसत !! पेशव्यांनी इनाम जप्त केल्याबद्दलचा लेख कमिशनापुढे येई, आणि तें पुनः परत दिल्याचा लेख कोठें जाई कोण जाणे ! राबर्ट नैट ह्यांच्यानें इनामकमिशनाचीं ह्रीं दुष्कृत्यं