पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३ - ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेंत ते असें ह्मणतात कीं, “ह्या- कमिशनासारखें कमिशन युरोपखंडांतल्या कोणत्याही दे- शांत – इतकेंच नाहीं, तर हिंदुस्थान शिवाय करून पृ थ्वीवरच्या दुसऱ्या कोणत्याही देशांत - जर सरकारानें चालू केलें असतें, तर लोकांनी तात्काळ बंड करून रा ज्यक्रांति केली असती. हिंदुलोक फारच सोशिक ह्म- णून त्यांच्या हातून तसें कृत्य घडलें नाहीं. " !!! हें ह्मणणें शब्दशः खरें आहे. शेवटल्या बाजीरावाचा पराजय खडकी येथें झाल्यानं- तर पुण्यास इंग्रजांचा अमल बसला; तेव्हां मौंट स्तुअर्त एल्फिन्स्टन ह्यांनीं तारीख ११ माहे फेब्रुवारी सन १८१८ रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांत असे स्पष्ट ह्मटलें आहे की, “लोकांच्या स्थावरजंगमाचें संरक्षण उत्तम प्रकारें केलें जाईल, सगळीं वेतनें आणि इनामें पू- वींप्रमाणें चालविली जातील." ह्या वचनावर भरंवसा ठेवून देशांतल्या बहुतेक सर्व वतनदार, जाहागीरदार, वगैरे लोकांनीं बाजीरावाचा पक्ष सोडून इंग्रजांचा पक्ष स्वीका- रिला, आणि ह्यामुळे इंग्रजांस आपला अमल बसविण्यास फार सोपें पडलें. परंतु, ते लोक निमकहराम झाले ह्मणून त्यांवर ईश्वराचा कोप झाला ह्मणा, किंवा बहुतेक सर्व ●राज्यकर्त्यांच्या रीतीप्रमाणें, आपले काम झालें, आतां को- ठलें आमचें वचन आणि कोठले आह्मी, असें इंग्रजसर- कारच्या मनांत येऊन ह्मणा, त्या सरकाराची लोभदृष्टि त्या इनामदारांकडे वळली, आणि सन १८५२ चा ११ वा आक्ट पसार होऊन, इनामकमिशन स्थापित झालें. चालू आहेत त्या इनामांपैकी बहुतेक सर्व इनामें ल-