Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ सन १८५८ वर्षाच्या प्रारंभी मि. नैट हे पुनः एडिटराच्या कामावर रुजू झाले. परंतु डा. बुइस्ट ह्यांनी लागलेंच एक दुसरें वर्तमानपत्र काढिलें. ह्या नव्या पत्रांत व मुंबई- तल्या इतर इंग्रजी पत्रांत मि. नैट ह्यांची निंदा व निर्भ- र्त्सना भरलेली असे. तरी, मि. नैट ह्यांनी आपला स्व- तंत्रपणाचा, न्यायाचा, व सुनीतीचा क्रम सोडिला नाहीं. ते, एतद्देशीय लोकांच्या वतीनें, आमचे देशबांधवही भां- डणार नाहींत, इतक्या नेटानें भांडत असत. सन १८५९ वर्षाच्या अखेरीस त्यांनी बाँबे टाइम्स दुसऱ्या एका पत्राशीं सामील करून त्यास "टाइम्स आफू इंडिया" हें नांव दिलें; तेंच नांव अद्याप चालू आहे. मि. नैट ह्यांचे स्वतःचे लेख, आणि सर मायकेल वेस्ट्राप, सर अ- लेक्झांडर ग्रांट, सर जार्ज बर्डवुड, सर रेमंड वेस्ट इत्यादि विद्वान् गृहस्थांचे लेख, ह्यांवरून, त्या वेळेस टाइम्स आफ् इंडिया इतका महत्त्वास चढला होता कीं, मोठमोठ्या जकारणांच्या संबंधानें, तो ह्मणे तसें होत होतें. मि. नैट ह्यांनीं सन १८६४ सालपर्यंत तें पत्र चालविलें. इतक्या अवधींत त्यांनीं मोठमोठ्या पुष्कळ विषयांवर निबंध लि- हून लोकांचें हित करून त्यांची प्रीति संपादिली. रा- / मि. नैट ह्यांनीं जीं पुष्कळ मोठालीं कामें आमच्या राष्ट्राच्या हितार्थ केलीं, त्यांपैकी प्रमुखांत, त्यांनीं इनाम कमिशनाचीं कृष्ण दुष्कृत्यें उघाडकीस आणून, तीं पार्ल- मेंटापर्यंत पोंचवून, त्या कमिशनास धुडकावून लावलें, हें एक आहे. मि. राबर्ट नैट ह्यांनीं त्या इनामकमिशनावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्यांनीं त्या कमिश- नाच्या कृष्णकारस्थानांचें फार चांगलें वर्णन केलें आहे.