पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७१ महिन्यांनीं शिपायांच्या बंडास आरंभ झाला, आणि त्याव- रोबर हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व इंग्रज वर्तमानपत्रकर्ते सर्व एतद्देशीय लोकांवर पिसाळून त्यांचा सूड घ्यावा ह्मणून अत्यंत सक्तीचे लेख लिहू लागले. तें बंड केवळ शि- पाई लोकांचें होतें, त्यांत बाकीच्या जनसमूहाचा बिलकुल संबंध नव्हता, अशी खरी गोष्ट होती; तरी, त्या वेळचे इंग्रज लोक रागाच्या आवेशाच्या भरांत ती अगदीं विस- रून भलभलतें बकूं लागले होते. परंतु मि. नैट ह्यांनीं त्या प्रसंगी शांत मनानें सर्व गोष्टींचा विचार केला, आणि स्वकर्तव्यास जागून, आपल्या वेडावलेल्या देशबांधवांस त्यांच्या चुक्या स्पष्टपणें दाखविल्या, आणि त्या वेळचे ग- व्हर्नर जनरल लार्ड क्यानिंग हे बंडाच्या शमनार्थ जे योग्य उपाय योजीत होते, त्या उपायांस पुष्टीकरण व्हावें असे लेख लिहिले. हा प्रकार येथील साधारण युरोपियन लोकसमूहास बिलकुल आवडला नाहीं; आणि डा. बुइस्ट रजेवरून परत आल्यावर बांबे टाइम्समध्यें बाकीच्या इंग्रजी पत्रांप्रमाणें अनर्थोत्पादक लेख जेव्हां लिहूं लागले, तेव्हां त्यांस अमळ धीर आला. परंतु त्या वेळीं टाइम्स पत्राची मा- लकी एका एतद्देशीय कंपनीकडे असत्यामुळें, त्या कंपनीच्या भागीदारांची सभा भरून असा ठराव झाला कीं, डा. बुइस्ट ह्यांचे लेख अनुदार, लोकांच्या विरुद्ध, आणि अन्याय्य असून, त्यांच्या योगानें आमच्या एतद्देशीय संस्थानिकांच्या मनांत त्वेष उत्पन्न झाला आहे, आणि ब्रिटिश देशी प्रजेच्या मनांत नाखुषी उत्पन्न झाली आहे, ह्मणून डा. बुइस्ट ह्यांस कामावरून काढून टाकून, मि. नैट ह्यांची नेमणूक त्यांच्या जागीं करावी. आणि त्याप्रमाणें •