पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० प्रकार उघाडकीस आणिले पाहिजेत; आणि एकंदरींत, सगळ्या देशाच्या, किंबहुना सगळ्या जगाच्या इतिहा- साकडे लक्ष देऊन, त्याच्या ज्ञानाचा लाभ साधारण ज- नसमूहास प्राप्त करून दिला पाहिजे. हीं कर्तव्यें मनांत बाळगून जे वर्तमानपत्रकर्ते आपले काम करीत असतात, त्यांचीं वर्तमानपत्रे ह्मणजे देशांतली एक प्रबल शक्ति होऊन बसते. आमच्या हिंदुस्थानांत जे ह्या प्रकारचे व र्तमानपत्रकर्ते होऊन गेले, त्यांत राबर्ट नैट हे प्रमुख होत. इनाम कमिशनाच्या संबंधानें तर ह्यांचें नांव स- र्वत्र प्रसिद्ध आहे. त्यांचें अल्प चरित्र आह्मी येथें सा- दर करितों. . राबर्ट नैट ह्यांचा जन्म तारीख १३ माहे मार्च सन १८२५ रोजीं स्काटलंड देशांत झाला. हे आपल्या व- याच्या तेविसाव्या वर्षी मद्यक्रयविक्रय करणाऱ्या एका कंपनीचे मुनीम होऊन मुंबईस आले, आणि त्या कंप- नीचें दिवाळें निघाल्यावरून त्यांनी एक पुस्तकांचें दुकान कांहीं दिवस चालविलें, आणि मग कांहीं दिवस दलालाचें काम केलें. परंतु त्या कामापेक्षां अधिक महत्त्वाचें व लो- कहिताचें काम त्यांच्या हातून व्हावयाचें होतें, ह्मणूनच की काय, हीं कामे करून फावल्या वेळांत, त्या वेळच्या बांबे टाइम्स वर्तमानपत्रांत लिहिण्याची त्यांस बुद्धि झाली. तेव्हां त्यांची लेखनशक्ति पाहून, त्या पत्राचे त्या वेळचे एडिटर डा. बुइस्ट ह्यांनीं त्यांची फार तारीफ केली; आणि तिच्या योगानें, डा. बुइस्ट हे रजेवर गेले तेव्हां, मि. नैट हे तारीख १ माहे जानेवारी सन १८५७ पासून त्या पत्राचे आक्टिंग एडिटर झाले. एडिटराचें काम हाती घेतल्यावर सुमारें चार