पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर फ्रेडरिक राबर्ट्स, हिंदुस्थानचे सेनापति, सिमला येथें व्याख्यान देतां देतां, बोलले कीं, लष्करांत मद्यपाननिषेधक मंडळी स्थापित झाल्या- पासून, सैन्यांत अपराध कमी होत आहेत, आणि शिपायांच्या प्रकृति सु- घारूं लागल्या आहेत. बौद्धधर्माविषयीं तिबेटांतून एक फार मोठा ग्रंथ हिंदुस्थानसरकारानें मिळविला आहे. त्याची वेगळीं वेगळीं २२५ पुस्तकें आहेत. प्रत्येक पुस्तक दोन लांब आणि साहा इंच जाड आहे. त्या पुस्तकांवरून प्राचीन इतिहास पुष्कळ कळेल ह्मणतात. बालविवाह आणि असंमत वैधव्य ह्यांचा परिपाठ बंद करण्याच्या उद्यो- गाकरितां मलबारी शेट ह्यांनीं, मोठमोठ्या वजनदार माणसांची एक सभा विलायतेस स्थापित केली आहे. हा परिपाठ आमचा आह्मी, आतां तरी उमजून-जुने नवे एक होऊन - बंद करावा कीं नाहीं ! फ्रान्सांत नारळापासून सिलुलोज ह्मणून एक पदार्थ तयार केला आहे. तो पदार्थ घन असून, त्याचें विशिष्टगुरुत्व बुचाच्या लांकडापेक्षाही कमी आहे. त्याच्या योगानें गलबत समुद्रांत कधींच बुडावयाचें नाहीं, असें करतां येईल ह्मणतात ! हिंदुस्थानांत एकंदर १६०९५ मैल आगगाडीचा रस्ता सध्या वाहात आहे. त्यांत एकवीस हजार दोनशें सत्याण्णव लाख रुपये भांडवल पडलें आहे. त्याचें एकंदर उत्पन्न दरसाल सुमारे सव्वादोन कोटि रुपये होतें. ह्या गाड्यांत, इ० स० १८८९ ह्या वर्षीत, ११०४०२३८३ उतारू गेले ! पोरबंदर संस्थानांत कोणीएक मनुष्य लबाड्या करून संस्थानाचे, हजारों रुपये खात होता. त्या संबंधानें चौकशी करण्याचे कामांत कोणीएक पोर्तुगीज मनुष्य अडथळे आणूं लागला. ह्मणून त्याला रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित ह्यांनी पकडिलें होतें. त्यावरून त्यांवरच काहूर रचण्याची खटपट विरुद्ध पक्षानें चालविली होती. परंतु, "सत्यमेव जयते” हें खरें होउन, त्या पोर्तुगीज माणसास आणि संस्थानचे एंजिनिअर मि० सानफर्ड यांस बडतर्फी मिळाली, आणि रावबहादुरांनीं आपलें काम बरोबर केलें असें झालें.