पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोक काय बोलतात. मि० ह्यूम हे पार्लमेंटाचे मेंबर होण्याचा प्रयत्न करीत आहेत. मातींतून सोनें काढण्याच्या कामांत विजेचा उपयोग करण्याचें एक न वीन यंत्र निघालें आहे. रशियाच्या बादशहाचे ज्येष्ठ चिरंजीव पुढच्या नोवेंबरांत हिंदुस्थान पा- हायास येणार आहेत. ते नामदार व्हाइसराय साहेबांचे पाहुणे होतील. मुंबईच्या लार्ड रे स्मारक कमिटीनें लार्ड रे यांचा एक पंचरस धातूचा पुतळा आणावयाचें ठरविलें आहे. खर्च पन्नास हजार रुपये लागेल. कलकत्त्यास एक लग्न झालें. वराचें नांव चंद्रराव, तो पस्तीस वर्षांचा आहे; आणि नवरी मुलगी-नऊ वर्षांची नव्हे हो-नऊ महिन्यांची आहे !! कलकत्त्यास आगकाड्यांच्या पेट्या इ० स० १८८९-९० ह्या वर्षात पांच लाख रुपयांच्या आल्या. ह्मणजे गेल्या पांच वर्षात दुप्पट झाली आहे. गोवें येथें तेथल्या गव्हर्नराचा पक्ष व लोकपक्ष यांमध्यें झटापट होऊन, गव्हर्नराकडच्या शिपायांनीं लोकपक्षाच्या लोकांवर हल्ला करून त्यांतले बरेच लोक मारिले. डा० कीर्तीकर यांस मुंबईचे आक्टिंग हेल्थ आफिसर नेमिलें आहे. नेमणूक चांगली झाली. त्या जागीं युरोपियन आणण्याचा प्रयत्न चालला होता, परंतु तो हुकला. खंबायत संस्थानांत इंग्रजी पद्धतीवर जमीनमहसूल घेण्याची व्यवस्था सुरू केल्यामुळे शेतकरी लोक खवळले आहेत. गेल्या महिन्यांत सरका राच्या लोकांची व त्यांची झटापट होऊन शेतकऱ्यांपैकी पुष्कळ ( कोणी झणतात २०० ) लोक मारिले गेले. गेल्या सिव्हिल सर्विस परीक्षेत जे ६ एतद्देशीय उमेदवार पास झाले, यांतल्या बाबू अरविंद घोस यांनीं ल्याटिन व ग्रीक या भाषांत १४०० गुणांपैकीं १२११ गुण मिळविले ! ! १००० गुण मिळविणें झणजे परा- क्रम समजतात. शाबास !