पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हात असतो. ह्मणजे, ती नदी चढून जाण्यास तारवांस ह्मणून ही नदी व्यापा- आणि दक्षिण बिलकुल प्रयास पडत नाहींत. राच्या कामाला अत्यंत उपयोगाची आहे. अमेरिका सृष्टिजन्य पदार्थात फार संपन्न आहे; ह्मणून ह्या नदीच्या भोंवतीं पुढें एक मोठें बलाढ्य राष्ट्र उत्पन्न होईल असा संभव आहे. नद्या फार मोठमोठी कामें करीत आहेत. तीं कामें माणसांच्यानें कधीं व्हायाचीं नाहींत. नद्या देशांस सु- पीक करितात; नद्या पृथ्वीवरच्या उपयुक्त द्रव्यांची वां- टणी सर्वत्र सारखी करण्यांत साह्य करितात; पावसाचें आणि बर्फाचें पाणी वाहून दूर दूर देशांस नेतात; अवा- ढव्य जंगलें पोसतात; हवा शुद्ध करितात; उष्ण प्रदेशांस थंडावा देतात; आणि, प्राण्याच्या शरीरांतल्या धमन्या जशा त्यास उपयोगी पडतात, तशा नद्या ह्या पृथ्वीवरल्या राष्ट्रांस उपयोगी पडतात. - ह्या संबंधानें उत्तर व दक्षिण अमेरिका यांसारखें दैव- वान दुसरें कोणतेंही खंड नाहीं. ह्या दोनही खंडांतल्या नद्या फार लांब, पुष्कळ अंतरापर्यंत गलबतें चालण्यासा- रख्या व त्या खंडाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत गेलेल्या आहेत. एका अमेझान नदींतून, गंगा, सिंधु, ओबी, येनिसी, अ- मूर, होआंगहो व यांगटेसी या सात मोठाल्या नद्यांच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी समुद्रांत जातें ! ! या संबंधानें हें सुदैव आहे कीं, तीं खंडें बलाढ्य राष्ट्रांच्या हातांत पडलीं आहेत. आणि तीं राष्ट्रे ह्या उत्तम साधनांचा " चांगला उपयोग करीत आहेत.