पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६५ अत्यंत भयंकर असतो; तो कितीएक कोसपर्यंत ऐकू येतो. तो ऐकून खलाशी आणि कोळी भिऊन पळून जातात. हिंदुस्थानांतल्या सर्वांत मोठाल्या नद्या झटल्या ह्मणजे, सिंधुनद, भागीरथी, व ब्रह्मपुत्रा ह्या होत. नद्या हिमालय पर्वतांत उगम पावतात. असा एक चमत्कार आहे कीं, हिमालयाच्या उत्तरेक- डच्या व दक्षिणेकडच्या दोन्ही बाजूंवर पाऊस व बर्फ ह्यांच्या रूपानें जितकें ह्मणून पाणी पडतें, तितकें सगळें या नद्यांच्या योगानें हिंदुस्थानास मिळतें. सिंधुनद व ब्र ह्मपुत्रा ह्यांचा उगम हिमालयाच्या उत्तरेकडच्या बाजूस आहे. ह्मणून त्या बाजूवर जितकें पाणी पडतें, तितकें ह्या नद्यांत येतें. आणि दक्षिणेकडच्या बाजूवर पडतें तें पाणी भागीरथीस येऊन मिळतें. सिंधुनद व ब्रह्मपुत्रा ह्यांचा असा एक चमत्कार आहे कीं, ह्यांचे उगम अगदी जवळ जवळ झालेले आहेत; तरी सिंधुनद हिंदुस्थानाच्या अगदी पश्चिमेकडच्या सरहद्दीवरून वाहातो, आणि ब्रह्मपुत्रा अ गदीं पूर्वेकडच्या सरहद्दीवरून वाहाते. ह्या तिन्ही आणि ह्यांचा दक्षिणअमेरिकेंतली अमेझान नदी तीन हजार नऊशें मैल लांब आहे. ह्या नदीचा असा एक चमत्कार आहे कीं, उगमाच्या बाजूचे दीडहजार मैल सोडले, ह्मणजे बा - कीच्या दोन हजार मैलांत एक धबधबा, कीं एक भोंवरा, कीं मोठाले खडक, असें कांहीं नाहीं. ह्मणजे एकादी होडी त्या नदींत सोडिली, तर तिच्या गतीस बिलकुल प्रतिबंध न होतां तिला दोन हजार मैल एकसारखें जातां येईल. दुसरा असा चमत्कार आहे कीं, तिच्या मुखापा- सून उगमाच्या दिशेनें बारा महिने एकसारखा वारा वा-