पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ प्णता मनस्वी असल्यामुळे, तिच्या पाण्याची वाफ मो- ठ्या झपाट्यानें होऊन जाऊन, तितकें पाणी कमी होतें. त्याप्रमाणेंच समुद्रास मिळण्याच्या संबंधानें त्यांचे अ- नेक चमत्कार आहेत. भागीरथी नदी बंगालच्या उपसा- गराला पुष्कळ मुखांनीं मिळते. आणि त्या मुखांच्या म धल्या लहान लहान बेटांसारख्या स्थलांस सुंदरबनें ह्मण- तात. व्होलगा ही नदी समुद्रास सत्तर मुखांनी मिळते. त्याच रीतीनें हैन, नैल, ओरिनोको, मिसिसिप्पी ह्या नद्या अनेक मुखांनीं समुद्रास मिळतात. ह्यांतल्या किती- एक नद्या समुद्राला फार जोरानें मिळतात. त्या इतक्या कीं, त्या समुद्रांत शिरल्यावर त्यांचें पाणी कितीएक मैल- पर्यंत समुद्राच्या पाण्यांत न मिसळतां, तसेंच वेगळें रा- हतें. हैन नदीच्या मुखासमोर समुद्रामध्यें एके वेळीं इं- ग्लिश आरमार मुकाम करून राहिलें होतें. त्याला तेथें समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाखालून, त्या नदीचें गोड पाणी काढून घ्यावयाला सांपडलें. दक्षिण अमेरिकेची ज- मीन दृष्टीस पडण्याच्या आधींच आपलीं गलबतें गोड्या पाण्यांत आहेत, असे कोलंबसाला आढळून आलें; आणि पुढे असे समजलें कीं तें पाणी ओरिनोको ह्या नदीचें होतें. त्या नदीच्या पाण्याचा जोर आणि समुद्राच्या पाण्याचा जोर ह्यांची मोठी झांगड कधीं कधीं दृष्टीस पडते. झांगडीनें पर्वतप्राय लाटा माडमाड उंच उडतात. आणि त्यांत जर एकादें जाहाज दुर्दैवानें सांपडलें, तर, त्याचा सत्यनाश होतो. हा प्रकार, ग्यारोननदी बिस्केच्या उप- सागरास मिळते तेथें आणि भागीरथीनदी बंगालच्या उ पसागरास मिळते तेथें फार दृष्टीस पडतो. त्याचा शब्दही