पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बुद्ध्या ओढूनताणून केलेला अलंकार हा बळें बळें हंसण्या- सारखा होतो. त्यानें कांहीं चांगलें कार्य तर होत नाहीं; पण, मूर्खपण मात्र पदरीं येतें. ह्मणून तसें कोणीं करूं नये. नद्यांविषयीं कांहीं माहिती. दोन नद्या एकमेकींस मिळाल्या ह्मणजे त्यांचें पाणी पु- प्कळ झाल्याच्या योगानें त्या एकत्र नदीचें पात्र मोठें झा- लेंच पाहिजे असें मनांत येतें. पण तसे होत नाहीं, एवढेंच केवळ नव्हे; तर त्याच्या उलट प्रकार घडून येतो. अमेरिकें- तल्या मिसिसिप्पी आणि मिसौरी ह्या नद्या जेथें एकमेकींस मिळतात, तेथें मिसिसिप्पीची रुंदी दीड मैल आहे, आणि मिसौरीची रुंदी अर्धा मैल आहे. परंतु, त्या ठिकाणापासून ती एकत्र झालेली नदी मिसिसिप्पी हें नांव पावून समुद्रास मिळेपर्यंत तिच्या पात्राच्या रुंदीचें साधारण प्रमाण सुमारें पाऊण मैल आहे. ह्याचें कारण असे सांगतात कीं, पाणी फार होऊन त्याचा जोर वाढल्यामुळे त्या नदीच्या पा- त्राची खोली वाढते, आणि त्या मानानें रुंदी कमी होते. नैल नदी कैरो येथें रुंद आहे तितकी सौट येथें नाहीं, आणि सौट येथें आहे तितकी थीब्स येथें नाहीं. अगदीं वर ह्मणजे असौवान येथें तिच्या पात्राची रुंदी ३९०५ फूट आहे; औडी येथें- ह्मणजे कैरोपासून वर ३६ मैलांवर २९०० फूट आहे; रासेटा येथें ह्मणजे तिच्या मुखाजवळ तिची रुंदी अवघी १८०० फूट आहे. ह्याचें कारण वे गळं आहे. तें हें कीं, न्यूबियापासून खालीं भूमध्यसमुद्रा- पर्यंत नैल नदीला एकही नदी न मिळतां, सूर्याची उ