पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ "मूर्खाला उपदेश करणें हें पालथ्या घागरीवर पाणी ओतणें होय. " हा निदर्शनालंकार होय. - सारालंकार. - एकापेक्षां दुसरा अधिक आणि दु- सन्यापेक्षां तिसरा अधिक अशा क्रमानें पदार्थोचें वर्णन केलेलें असतें, तेथें सारनामा अलंकार होतो. आर्या. राया कुलार्थ पुरुष ग्रामार्थ कुलहि समस्त सोडावें ग्रामहि देशार्थ मही आत्मार्थ बुधें भलेंचि जोडावें. मोरोपंत. श्लोक. पटुत्व सकलेंद्रियों मनुजता सुवंशीं जनीं द्विजवहि दिलें भलें बहु अलभ्य जें कीं जनीं यशःश्रवणकीर्तनीं रुचि दिली तरी हांवरा ह्मणे अधिक द्याच कीं अखिल याचकीं हांवरा. मोरोपंत. श्लोक. उत्तरोत्तर उत्कर्षा सारपंडित बोलती मधाहुनी सुधा गोड तीहूनी कविभारती. गणेशशास्त्री लेले. हे थोडेसे अलंकार सांगितले. असे आणखी पुष्कळ आहेत. तें एक वेगळें शास्त्रच आहे. पण, अलंकार हें काय असतें, हें थोडक्यांत दाखविण्याकरितां हा निबंध लिहिला आहे. भाषणांत अलंकार बुद्ध्या करूं असें मनांत आणिल्यानें अलंकार होत नाहीं. वर्णनाच्या व्याप्तीनें तो आपोआप पुढे येतो. आणि तोच शोभून अर्थाचा गौरव करितो. आणि