पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६१ असा एक अर्थ, आणि, अगे नल हें औषध, असा दुसरा अर्थ आहे; ह्मणून हा श्लेषालंकार झाला. - अन्योक्ति. — भाषण करावें एकाविषयीं आणि तें लागा- वें दुसऱ्याला, असा अर्थ असतो तेथें अन्योक्ति अलंकार होतो. बाजीराव पळत असतां, त्यास पाहून एकाद्यानें ह्मणावें. श्लोक. ज्याचे पूर्वी वसंती परिमलबहली आम्रवृक्षी सुखाचे गेले गुंजारवातें दिवस परिसतां मत्तभृंगांगनांचे कैसे त्या कोकिळातें अधम करिति हे कावळे चंचुघाता कोठें थारा मिळेना गरिब पळतसे वांकडा काळ येतां. थोरले चिपळूणकर. ह्याच अलंकाराला अप्रस्तुतप्रशंसालंकार ह्मणतात. व्याजस्तुति. - शब्दांत स्तुति असावी, पण निंदा गर्भित असावी, ह्या अलंकाराला व्याजस्तुति अलंकार ह्म- णतात. "तुझी मोठे शहाणे आहां", "तुझी आमचे उप- कार चांगले फेडले" हीं व्याजस्तुतीचीं उदाहरणे आहेत. - प्रश्नालंकार. – प्रश्न असून, उत्तराची अपेक्षा नसते, तर प्रश्नानेंच अर्थगौरव होतो, तो प्रश्नालंकार होय. "ऐसा होईल अन्य काय कवी" "शिकंदराला कांहीं कमी होतें का ?" हे प्रश्नालंकार होत. निदर्शना. - परस्परांशीं सदृश असून त्यांचा ऐ- क्यारोप असतो, तेथें निदर्शनालंकार होतो. आर्या. त्वद्रत्नतस्कराला केला मी बोध फार आरडलों अंधभसितबधिरीतें दीपहवनगीत की वनीं रडलों. मोरोपंत.