पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० - अपन्हुति. - उपमेयाच्या स्वरूपाचा अपलाप करा- वयाचा, आणि उपमेयावर उपमानाचा आरोप करावयाचा, असा जो अलंकार आहे, त्यास अपन्हुति ह्मणतात. ह्यांत आणि रूपकांत अंतर एवढेंच आहे कीं, रूपकामध्यें उप- मान तेंच उपमेय आहे, असें वर्णन असतें, आणि अपन्हुतींत, उपमान आणि उपमेय ह्या दोहोंचें सादृश्य वर्णिलेलें असतें. आर्या. सखिहस्ती हस्त न वृष पांडवहृदयांत सायका मारी क्रोधातें भीम गिळी गरळातें जेविं काय कामारी. मोरोपंत. “बाजीरावानें तो राज्याचा हक्क सोडला नव्हे; तर आमच्या महाराष्ट्रानें राष्ट्रत्व सोडिलें." उत्प्रेक्षा. – हें उपमानच की काय अशी संभावना उपमेयावर केलेली असते, तेथें उत्प्रेक्षा अलंकार होतो. त्याच्या वर्णनांत, जणूं काय, अशा अर्थाचे शब्द येत असतात. " हा जणूं काय बाजीरावाचा नातू आहे." आर्या. सानुज सदार अर्जुन दुर्योधन खेचरेश्वरें धरिला जाणो क्षितिहृदयींचा साक्षात् कांटाचि तो समुद्धरिला. मोरोपंत. येथें दुर्योधन हा जणूं काय पृथ्वीच्या हृदयांतला कांटा ह्मटला आहे. हा उत्प्रेक्षालंकार झाला. - श्लेपालंकार. - शब्दाचा अर्थ दोहोंकडे लागतो तेव्हां श्लेपालंकार होतो. “औषध नलगे मजला" – ह्यांत नलगे ह्मणजे नको, -