पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ मनांत भरतो, त्या भाषणास अर्थालंकार ह्मणावें. हे अर्था लंकार अनेक आहेत. त्यांत मुख्य उपमालंकार आहे. कोणी एका ज्ञात्यानें तर असें ह्मटलें आहे कीं, इतर अ र्थालंकार जे आहेत, तीं सगळीं उपमालंकाराची वेगळी वेगळीं स्वरूपे आहेत. उपमालंकाराचें वर्णन करितांना उपमान आणि उपमेय हे शब्द वारंवार येतात. उपमान ह्मणजे, वर्णनाकरितां जें काय बाहेरचें सांगितलेलें असतें तें. आणि उपमेय ह्मणजे ज्याचें वर्णन केलेलें असतें तें., श्लोक. जो धैर्ये धरसा सहस्रकरसा तेजें तमा दूरसा जो रत्नाकरसा गभीर सुरसा भूपां यशोहारसा ज्ञाता जो सरसावला नवरसांमाझारि शृंगारसा शोभे तामरसाक्ष तो नळ रसानाथ स्तवूं फारसा. रघुनाथपंडित. ह्यांत सा ह्मणजे सारखा, असे आहे. ह्मणून, घर, सहस्रकर, रत्नाकर, हीं उपमानें आहेत, आणि नळ हें उपमेय आहे. कोणत्याही अर्थालंकारांत, कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें, उपमान आणि उपमेय हीं गर्भित रीतीनें किंवा स्पष्ट रीतीनें विद्यमान असतात. रूपकालंकार. – उपमालंकारांत, सारखा, वत्, इ- त्यादि अव्ययें योजून सादृश्य वर्णिलेले असतें; आणि, रूपकामध्ये त्याचा अतिशय करून- ह्मणजे त्यासारखा नव्हे तर प्रक्षत्य तोच - असें वर्णन केलेलें असतं. ह्मणजे उपमान आणि उपमेय ह्यांचा अभेद वर्णिला असतो. -