पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ जो अक्षरें ज्या क्रमानें एकापुढें एक येतात, तींच अ- क्षरें त्याच क्रमानें पुनः एकापुढें एक आलीं ह्मणजे तेथें यमकालंकार होतो. श्लोक. गजगती जगतीप्रति दाविते वसुमती सुमती सुख भाविते स्वतनुजा तनु जाणतसे धरा नवरि ते वरिते मणिकंधरा. वामन. ह्यांतल्या पहिल्या चरणांत 'जगती' ह्याची आवृत्ति झाली आहे; दुसऱ्यांत, 'सुमती' ह्याची आवृत्ति झाली आहे; तिसऱ्यांत, 'तनुजा' ह्याची आवृत्ति झाली आहे; आणि चवथ्यांत 'वरिते' ह्याची आवृत्ति झाली आहे. ह्मणून येथें यमकालंकार झाला आहे. आर्याध वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो. राय असें आयकतां हाय ह्मणे बायको न हे कृत्या. मोरोपंत. ह्रीं यमकांची उदाहरणें वामन आणि मोरोपंत ह्यांच्या कवितांत विपुल आहेत. ह्या शब्दालंकारांनीं मनापेक्षां कानाचें रंजन अधिक होतें. ह्मणून सुज्ञ जनांत ह्यांची फारशी मातबरी मानीत नाहींत. ज्या भाषणाच्या योगानें अर्थाच्या स्पष्टीकरणास भर पडते, अर्थ उन्नत होतो, अर्थ विशेष खुलतो, अर्थ विशेष १४