पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ श्रांतीस लागू आहे. झोंप हें विश्रांतीचें झोंप हें विश्रांतीचें अत्युत्तम पर्य वसान आहे. आणि त्या पर्यवसानाचें पूर्ण सुख, श्रम झालेले असले ह्मणजे मिळतें, एरव्ही मिळत नाहीं. हाच अर्थ ह्या ह्मणीच्या उत्तरार्धीत आहे. ह्याच्या उद्योग हें कारण आहे, आणि श्रम हें कार्य आहे. चांगले श्रम होण्यास चांगला उद्योग केला पाहिजे. आणि चांगला उद्योग हा एक अत्युत्तम मित्र आहे. सहवासानें वेळ केव्हां कसा निघून जातो, हें कळत दे- खील नाहीं; कार्यसिद्धि होते; समाधान होतें; श्रम होतात; आणि विश्रांति सुखदायक होते. उद्योगशील मनुष्यास उगाच भलत्याच वेड्यावांकड्या गोष्टींवर कुढत बसण्यास वेळ मिळत नाहीं; आणि दुसऱ्याच्या अवगुणांकडे लक्ष पुरविण्यास सवड होत नाहीं. मग तो उद्योग शेत नांग- रण्याचा असो, लोहाराच्या कारखान्यांत घण मारण्याचा असो, किंवा ग्रंथ लिहिण्याचा असो. प्राचीन ग्रंथकारांनीं असें ह्मटलें आहे की, आपल्या निर्वाहास ज्या वस्तु आपणांस लागतात, त्या विकत घे- ण्यास, देवानें, श्रम ही किंमत ठेविली आहे. तें खरें आहे. श्रमांशिवाय कोणतीही वस्तु प्राप्त होत नाहीं. राबर्ट ब्रूस ह्याचें रक्षण झालें, त्याला देखील कोळ्याचे श्रम लागले. प्लेटो ह्यानें “प्रजासत्ताक राज्य" ह्मणून जो ग्रंथ लिहिला, त्याचा पहिला अध्याय, त्यानें, पुनः पुनः तेरा वेळ लिहून काढिला, तेव्हां तो चांगला - त्याला आवडण्यासार- खा - झाला, असे इतिहासांत लिहिले आहे. त्याप्रमाणेंच कार्लो माराटि ह्मणून एक कारागीर होता, त्यानें, आंटि- नाऊस ह्याचा मुखवटा पुनः पुनः तीनशेंवेळां केला, तेव्हां