पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ मी सत्य आहें तव अंतरात्मा तो शुद्ध निष्पाप खरा महात्मा सोडूनियां दूर तया रहाया सामर्थ्य नाहीं तुज जीवेराया. माझें तुझें ऐक्य असे अखंड येना कधींही तिळमात्र खंड तेव्हां मला चोरुनि कार्य कांहीं येणें तुला बा करितांच नाहीं. ठेवोनियां साक्षिस बुद्धिलागीं सारीं स्वकृत्यें कर जागजागीं भंगूं नको अल्प तिच्या मतातें ऐशा करीं संतत वर्तनातें. वाटेल निष्पाप तुझ्या मतीतें साधीं प्रयत्नीं बहु त्या कृतीतें मानेल नि:संशय ती मलाही होईल तूतें बहु सौख्यदायी. ३. ४. ६. श्रम आणि विश्रांति. " भुकेला कोंडा आणि झोंपेला घोंडा" ही ह्मण स- वीस ठाऊक आहे. आणि हिचा अनुभव सगळ्या स- मंजस माणसांस आहे. ह्या ह्मणीच्या पूर्वार्धाचें तात्पर्य असे दिसतें कीं, भूक चांगली चणचणीत लागली असली, ह्मणजे कोंड्याची भाकर देखील मनुष्याला अमृतासारखी गोड लागते. तें शब्दश: खरें आहे. तीच गोष्ट वि- १ जीव. २ मनुष्या.