पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ तो त्याच्या मनासारखा झाला. ह्मणजे तात्पर्य असें कीं, को- णतेंही कार्य चांगलें मनासारखें होण्यास श्रम केले पाहिजेत. देह काय आणि मन काय, कोणत्या तरी पर्यायानें लय पावावयाचें आहे. तें, उगीच राहून जागचेजागीं लय पावावें, त्यापेक्षां उद्योगानें झिजून झिजून क्षीण व्हावें, हें श्रेयस्कर आहे. लोखंडाचें हत्यार जंगून जंगून नाहींसें व्हावें, त्यापेक्षां, कामीं लागून झिजून झिजून नाहींसें व्हावें हें चांगलें आहे. सध्याचा काल श्रम करण्यास फार चांगला आहे. आ- पल्या श्रमाचें फल बळजबरीनें दुसरा कोणी घेऊन जाईल, हें भय आतां तिळमात्रही राहिलें नाहीं. प्रत्येक माण- सास स्वश्रमाच्या फलाचा उपभोग यथेच्छ घ्यावयास सां- पडतो. हें केवढें भाग्य आहे ! कधीं कधीं श्रमांचें इष्ट फल प्राप्त होत नाहीं, पण, श्रम करण्याची तेवढीच संवय वाढते, हा एक मोठा लाभ होतो. बापानें सांगितलेलें द्रव्य मुलांस शेतांत सांपडलें नाहीं. पण, त्या द्रव्याच्या आशेनें तें शेत चांगलें नांगरलें गेलें आणि त्यांत पीक चांगले आलें. ह्मणजे तात्पर्य असें आहे कीं, चांगले श्रम वायां कधीं जात नाहींत. त्यांचें चांगलें फल कोणत्या ना कोणत्या तरी रूपानें प्राप्त होतें.. - एमर्सन ह्मणून एक नामांकित ग्रंथकार होऊन गेला. त्याचा लेख एके ठिकाणी असा आहे :- “देव ह्मणतो, मा- णसांनो, तुझी पदोपदी उद्योग करा; त्याचें फल तुह्मांला तत्काळ मिळो वा न मिळो, उद्योग करा; मग तो चित्रे काढण्याचा असो, शेत पेरण्याचा असो, किंवा ग्रंथ लिहि- ण्याचा असो, तो प्रामाणिकपणाचा असावा - त्यांत कांहीं