पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० ह्मणजे, द्रव्याचा अत्युत्तम उपयोग ह्मटला ह्मणजं दान, तो ह्यांस चांगला कळला आहे, असें दिसतें. त्याप्रमाणेंच त्यांस खानदेशाचा अभिमान फार मोठा आहे. फार काय सांगावें, खानदेशाची हवा अतिश- यित उष्ण आहे असें कोणीं ह्मटल्याबरोबर लागलेंच "पण ती निरोगी आहे," असें ह्मटल्यावांचून रावबहादुर रा- हात नाहींत. असे प्रांतांप्रांतांचे अभिमानी पुरुष जे असतात, त्यांच्या अभिमानाची जी एकंदर बेरीज होते, तिलाच देशाभिमान असें नांव मिळतें. असे पुरुष आ मच्या राष्ट्रास पाहिजेत आहेत. रावबहादुर हे खानदे- शास मोठें भूषण आहे, असें ह्मणून, आणि त्यांचे हातून खानदेशाचें असेंच कल्याण पुष्कळ वर्षे होवो, असें पर- मेश्वरापाशीं मागून, आह्मी हें त्यांचें अल्प चरित्र समाप्त करितों. मनुष्यास देव ह्मणतो. श्लोक. मी व्यापितों सर्व चराचरांतें जाशील कोठें चुकवूनि मातें नाहीं असा ठाव मला दिसेना कोणीहि मातें झकवूं सकेना. मी जाणतों सर्वहि अंतरांतें जें तें घडे ज्ञान समग्र मातें कष्टुं नको तूं मजला ठकाया जातील तूझे श्रम सर्व वायां. १. २.