१४९ " ज्यांत ह्यांना मोठमोठ्या हुद्यांच्या जागा देत होते, परंतु त्यांनीं त्या नाकारिल्या, आणि आपला वकीलीचा धंदा उत्तम प्रकारें चालविला आहे. ह्यावरून ह्यांना स्वतंत्रता किती प्रिय आहे हें स्पष्ट दिसून येतें. ही गोष्ट आ- मच्या आधुनिक विद्वानांस कित्ता घेण्यासारखी आहे. हल्लीं ह्यांच्याकडे सार्वजनिक कामें आहेत तीं अशी:- १. म्युनिसिपालिटीचे व्हाइस प्रेसिडेंट. २. दिस्त्रिक्ट लोकलबोर्डाचे व्हाइस प्रेसिडेंट. ३. बेंच आफू माजिस्त्रेटचे चेअरमन. हीं कामें फार महत्वाची आहेत. ह्यांखेरीज बारीक- सारीक कामें पुष्कळ आहेत. आणि तशीच मोठी यो- ग्यता असल्यावांचून सरकारांतून तीं मिळत नाहींत, हें सर्वोस ठाऊक आहे. विद्यावृद्धीच्या कामांत ह्यांचें लक्ष फार आहे. संस्कृ तभाषेच्या उत्तेजनार्थ आपल्या पुतण्याचे नांवानें त्र्यंबक गरुडप्राईज' ह्मणून ह्यांनीं ५०० रुपये दिले आहेत. धु- ळ्याच्या नेटिव्ह जनरल लाब्ररीकरितां १००० रुपये दिले आहेत. आणि जुबिलीच्या समारंभाचे वेळेस धुळ्यांतील मराठी शाळांतल्या मुलांस दरसाल बक्षिस देण्याकरितां ५०० रुपये दिले आहेत. ह्या बक्षिसास 'गरुडप्राईज' असें नांव आहे. परवांच्या देवकुळेस्मारकास ह्यांनी शं- भर रुपये दिले आहेत. असे हजारों रुपये ह्यांनीं विद्या- वृद्धींत खरचिले आहेत. हे चांगले धर्मशील आहेत. ह्यांचेठायीं भूतदया फार आहे. दानधर्माकडे हे बराच पैसा खरचितात.
पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५२
Appearance